अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. 2014-15 साली अनुराग कश्यपला आपण भेटलो त्यावेळी दारूच्या नशेत त्याने आपल्यासह जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं पाय म्हणाली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)
अनुराग कश्यपवर असा खळबळजनक आरोप केल्यानंतर पायल घोष चर्चेत आली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)
पायल घोषने हिंदी सिनेमासह दाक्षिणात्य आणि पंजाबी फिल्ममध्येही काम केलं आहे. परेश रावल आणि ऋषी कपूर यांच्यासारख्या स्टारसह तिनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)
पायल घोषने 2017 साली आलेली पटेल की पंजाबी शादी या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्यासह ती मुख्य भूमिकेत होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)
पायलने एक कॅनेडियन फिल्मही केली आहे. यामध्ये तिनं एका शालेय मुलीची भूमिका केली, जिला तिच्या शेजाऱ्यांच्या नोकरासह प्रेम होतं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@iampayalghosh)