वेदना: जेव्हा तुम्ही एसीमध्ये झोपता तेव्हा खोलीचे तापमान रात्री इतके कमी होते की तुमच्या शरीराला अस्वस्थ वाटू शकते. अधिककाळ एसी लावून झोपल्यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवते.
श्वसनाशी संबंधित समस्या : जर तुम्ही तुमचा एसी वेळोवेळी साफ करत नसाल तर त्यात बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात. तसेच अशावेळी जर तुम्ही एसीत अधिक काळ राहिलात तर हवेतील बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तुम्हाला श्वासासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात.
कोरडी त्वचा: एसी खोलीच्या हवेतील सर्व आर्द्रता शोषून घेतो, ज्यामुळे तुमच्या त्वचेची आर्द्रता देखील नाहीशी होऊ लागते. यामुळेच एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा रात्रभर एसीमध्ये झोपल्यामुळे अनेकांची त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाज सुटणे सारख्या समस्या जाणवतात.
सर्दी: जर खोलीचे तापमान खूप कमी असेल तर तुम्हाला सर्दी देखील होऊ शकते. बरेच लोक 16 डिग्री सेल्सिअस तापमानातही एसी सेट करतात. एवढ्या कमी तापमानात झोपल्याने तुम्हाला सकाळी सर्दी होऊ शकते.
थकवा : जेव्हा तुम्ही एसी चालवता, त्या काळात घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद असतात, त्यामुळे बाहेरून ताजी हवा खोलीत येऊ शकत नाही. वेंटिलेशनची कमतरता आणि ताजी हवा न मिळाल्याने शरीरात थकवा येऊ लागतो.