NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाचा धोका; रुग्णालयात जाण्यापूर्वी नागरिकांनी काय घ्यावी काळजी?

कोरोनाचा धोका; रुग्णालयात जाण्यापूर्वी नागरिकांनी काय घ्यावी काळजी?

रुग्णालयामार्फत (Hospital) आवश्यक त्या नियमांचं पालन केलं जात असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 

110

कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी धावाधाव करत आहे. काही खासगी हॉस्पिटल्समध्ये ओपीडीला सुरुवात झाली असून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर, दुखण्यांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी.

210

इतर आजाराच्या रुग्णांनी किंवा इतर नागरिकांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे इंटरनल मेडिसीन एक्सपर्ट डॉ. तुषार राणे यांनी मार्गदर्शन केलं आहे.

310

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर शरीराच्या तापमानाची तपासणी, सॅनिटायझिंग असे कोरोनासंबंधी मूल्यांकन पूर्ण करूनच रुग्णालयात प्रवेश करावा.

410

रुग्णालयात पैसे भरण्यासाठी शक्यतो डिजीटल पर्यायांचा वापर करा.

510

तपासणीसाठी दिलेल्या वेळेचं पालन करा, त्या वेळेतच रुग्णालयात हजर राहा.

610

रुग्ण स्वत: रुग्णालयात जाण्यास सक्षम असतील तर शक्यतो त्यांनीच रुग्णालयात जावं. गरज असेल तरच सोबत एखाद्या व्यक्तीला न्यावं.

710

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.

810

सार्वजनिक शौचालयांचा वापर करू नका.

910

रुग्णालयातील वस्तूंना स्पर्श करणं टाळा.

1010

तपासणीनंतर तुमचे रिपोर्ट्स ऑनलाईन मिळतील का याची विचारणा करा.

  • FIRST PUBLISHED :