NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / थंडीच्या दिवसात डोळे कोरडे होण्याचा त्रास वाढतो; आधीपासून करा हे सोपे उपाय

थंडीच्या दिवसात डोळे कोरडे होण्याचा त्रास वाढतो; आधीपासून करा हे सोपे उपाय

Dry eye in winter- हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा, केस कोरडे पडण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे खूप त्रास होतो. परंतु, केवळ कोरडी त्वचाच नाही तर डोळ्यांतील ओलावा कमी होण्याची समस्या देखील हिवाळ्यात दिसून येते. जेव्हा आपल्या डोळ्यातील अश्रू ग्रंथी पुरेसे अश्रू तयार करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. ही स्थिती खूप वेदनादायक आणि अस्वस्थ ठरू शकते. म्हणून हिवाळ्यापूर्वीच हा त्रास टाळण्यासाठी काही टिप्स पाळल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. ही स्थिती केवळ वातावरणामुळेच नाही तर तुमच्या आरोग्य स्थितीमुळेही दिसून येते.

15

हिवाळ्यात थंडीमुळे जशी त्वचा कोरडी पडते, तसे डोळेही कोरडे होतात.

25

डोळे मिचकावत राहा : मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, तुम्ही बराच वेळ डोळे मिचकावत नसाल तरीही तुमचे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये नैसर्गिक वंगण राहण्यासाठी डोळे मिचकावत रहा.

35

हेअर ड्रायर टाळा: हेअर ड्रायर वापरल्याने व्यक्तीचे डोळेही कोरडे होऊ शकतात, त्यामुळे हिवाळ्यात अशा गोष्टींचा वापर शक्यतो करू नका.

45

धूम्रपान टाळा: सिगारेटच्या धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळे तुम्ही सिगारेट ओढणे टाळावे आणि आजूबाजूला कोणी मद्यपान करत असेल तर तिथे जाऊ नका.

55

भरपूर पाणी प्या: हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो परंतु हिवाळ्यात देखील हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे, म्हणून भरपूर पाणी प्या. या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त, स्क्रीन टाइम कमी करणे आणि डोळ्यांचे संरक्षण करणे यासारख्या इतर काही गोष्टींकडे लक्ष द्या.

  • FIRST PUBLISHED :