हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून बीपी संतुलित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बीपीचा आपल्या कुटुंबात, नातेवाईकांना कोणाला त्रास असेल तर रक्तदाब नेमका किती असावा याची आपल्याला माहिती असायला हवी. जाणून घेऊया वयानुसार महिला आणि पुरुषांचा रक्तदाब किती असावा. यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर अडचण आहे, हे समजावे.
पुरुषांना उच्च रक्तदाबाचा धोका! असे सांगितले जाते की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना उच्च रक्तदाबाची समस्या जास्त असते. जेव्हा एखाद्याला चक्कर येते तेव्हा ते कमी रक्तदाबाचे लक्षण असू शकते. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या छातीत दुखणे हे देखील रक्तदाबाचे लक्षण असू शकते.
पुरुषांमध्ये रक्तदाब इतका असावा - मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार रक्तदाबात बदल होत असतो. पुरुषांमधील वयानुसार, रक्तदाब 120 ते 143 पर्यंत पोहोचू शकतो. वयाच्या 21 ते 25 व्या वर्षी, SBP 120.5 मि.मी. तसेत 25 वर्षांनंतर 50 वर्षांपर्यंत रक्तदाब 115 पर्यंत असावा. याशिवाय 56 ते 61 वयापर्यंत रक्तदाब 143 पर्यंत असावा.
स्त्रियांच्या वयानुसार रक्तदाब इतका असावा - वयाच्या 21 ते 25 मध्ये, एसबीपी 115.5 मिमी असावा, तर 26 ते 50 मध्ये, बीपी 124 पर्यंत असू शकतो. याशिवाय 51 ते 61 वर्षांपर्यंत बीपी 130 पर्यंत असावा.