कोरोनाव्हायरसपासून बचाव करताना जसा मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात, सोशल डिस्टन्सिंग राखत आहात. तसाच महत्त्वाचा आहे तो आहे. शरीर हेल्दी राहण्यासाठी आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे.
आता हेल्दी राहण्यासाठी काय आणि किती खावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आयसीएमआरच्या हैदराबादमधील न्युट्रीशन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने एक डाएट चार्ज दिला आहे.
या रिपोर्टनुसार, दररोजच्या आहारातून शरीराला दोन हजार कॅलरी मिळायला हव्यात. मात्र त्यासाठी फक्त एका पदार्थावर अवलंबून राहू नये, तर वेगवगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. एकाच पदार्थावर अवलंबून राहिल्यास आपल्याला ऊर्जा मिळेल मात्र शरीरातील व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम आणि प्रोटिनचं प्रमाण असंतुलित होईल.
आहारात 270 ग्रॅम तांदळाचा भात किंवा गव्हाची चपाती घ्यावी. यामुळे जवळपास 2 हजार कॅलरीपैकी 45 टक्के कॅलरी मिळते.
90 ग्रॅम डाळींचा समावेश करा, यामुळे 17 टक्के कॅलरी मिळेल.
300 ग्रॅम दह्याचं सेवन करा आणि दूध प्या यामुळे 10 टक्के कॅलरी मिळतील.
दिवसभरात 150 ग्रॅम फळंही खावीत यामुळे 3 टक्के कॅलरी मिळते.
20 ग्रॅम नट्स आणि सीड्सचा समावेश करा. यामुळे 8 टक्के कॅलरी मिळेल.
आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार ऊर्जेसाठी आपल्याला फक्त 45 टक्के धान्यं घ्यायला हवीत. डाळ, फळं, मांस, अंडी, मासे यांचा आहारात जास्त समावेश करावा.
डॉक्टरांनी आयसीएमआरच्या या डाएट चार्टबाबत बोलताना सांगितलं, सूर्यप्रकाश, दही,गूळ आणि चणे यामुळेदेखील शरीराला ऊर्जा मिळते. ऑफिसमधील लोकांना हा डाएट चार्ज जशाच्या तसा फॉलो करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी ड्राय फ्रुट्स वर अवलंबून राहावं, एनर्जीचा हा स्रोत आहे. यामुळे शरीरातही व्हिटॅनमिन्सही पुरेशा प्रमाणात राहतात.