जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तातडीने चिप्स, फ्रेन्च फ्राइज, कांदा भजी, हिरवा टॉमेटो आणि ओकेरा खाणं पूर्ण बंद केलं पाहिजे. याशिवाय तळलेले पदार्थ तसेच तळलेल्या भाज्याही खाऊ नका. तळलेल्या पदार्थांमुळे पोट सुटतं.
कोबी- ब्रोकोली, कोबी या भाज्या शरीरासाठी कितीही फायदेशीर असल्या तरी त्या अतिरिक्त खाल्ल्यास वजन वाढू शकतं. त्यामुळेच कोबीची भाजी खाणं शक्यतो टाळावं. एवढंच नाही तर कोबीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात गॅसही होतो.
स्वीट कॉर्न- सिनेमाला गेल्यावर अनेकदा पॉर्पकर्न आणि कोल्ड ड्रिंग मागवलं जातं. हे आरोग्यासाठी फार घातक आहे. यामुळे वजन तर वाढतच शिवाय स्वीट कॉर्नमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.
पॅक केलेलं सलाड- शक्यतो डब्यात बंद केलेलं सलाड खाणं टाळा. हॉटेलमधून ऑर्डर मागवताना अनेकदा डबा बंद सलाड येतं. यात अनेकप्रकारच्या भाज्या असतात आणि ट्रान्स फॅटची मात्रा जास्त झाल्यास वजन वाढू शकतं.
याशिवाय बटाट्यामध्येही स्चार्च मोठ्या प्रमाणात असतं. बटाट्याशिवाय गाजरही कमी प्रमाणात खा. यामुळेही वजन वाढतं.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.