NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही... मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा

बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही... मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा

कोणत्याही लग्न समारंभात दागिन्यांना विशेष महत्त्व असतं. दागिन्यांमुळे सौंदर्य खुलून दिसतं, त्याचबरोबर सर्वांसमोर मिरवण्याचीही संधी मिळते.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
    Last Updated: December 11, 2022, 11:01 IST
17

कोणत्याही लग्न समारंभात दागिन्यांना विशेष महत्त्व असतं. दागिन्यांमुळे सौंदर्य खुलून दिसतं, त्याचबरोबर सर्वांसमोर मिरवण्याचीही संधी मिळते. त्यामुळे महिलावर्गाकडून लग्नाच्या निमित्तानं दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

27

मोत्यांच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या मुंबईच्या बाजारात दाखल झाले आहेत. बुगडी, कुडी, नथ, तन्मणी हार, अंगठी, चोकर, चिंचपेटी, बाजूबंद हे मोत्यांच्या दागिन्यांचे प्रमुख प्रकार खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.

37

बाजूबंद हा दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांचा वापर करून यात नक्षीकाम केलेली असते. मोत्यासह यामध्ये माणिक किंवा इतर स्टोन्स देखील वापरलेले असतात.

47

मोत्याच्या बांगड्या या प्राचीन काळापासून वापरल्या जातात. मोत्याच्या बांगड्या या शक्यतो हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात. विविध डिझाईनच्या मोती बांगड्यांचा सेट बाजारात उपलब्ध आहे.

57

चिंचपेटी हा मोत्याचा दागिना सुद्धा गळ्या लगत घातला जातो. चिंचपेटी हार शक्यतो नऊवारी साडीवर घातला जातो.

67

मोत्याचा हार नऊवारी साडी किंवा सहावारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची साडी असो त्यावर घातला की एक वेगळाच लुक येतो. मोत्याचा हार एक, दोन किंवा तीन सरींचा असतो. कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभात किंवा नेहमीच्या वापरासाठी सुद्धा मोत्याचा हार घातला जातो.

77

यावर्षी मोत्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे तसंच मोत्यांचे पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने दादर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. लोक राजेशाही थाट दाखवणाऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना अधिक पसंती देतात. 350 रुपये ते 5000 रुपयां पर्यंत अनेक दागिने उपलब्ध आहेत.

  • FIRST PUBLISHED :