NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / ही व्हिटॅमिन कमी पडत असतील तर चेहरा कमी वयातच वयस्क दिसू लागतो

ही व्हिटॅमिन कमी पडत असतील तर चेहरा कमी वयातच वयस्क दिसू लागतो

आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वांची आवश्यक असते. तसेच आपल्या निरोगी त्वचेसाठीही जीवनसत्त्वांची गरज असते. त्वचा निरोगी ठेवण्यासोबतच जीवनसत्त्वे मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासही मदत करतात. स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात काही विशेष जीवनसत्त्वांचा नक्कीच समावेश करा आणि त्वचा दीर्घकाळ सुंदर ठेवा. ही जीवनसत्त्वे त्वचेतील सेल्युलर नुकसान वेगाने बरे करून स्किनला रीजेनरेट करण्यास मदत करतात.

15

व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए त्वचेवरील तारुण्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे, कोलेजन वाढविण्यास, लवचिकता निर्माण करण्यास, मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान बरे करण्यास आणि मुरुमांपासून बचाव करण्यास त्याची मदत होते.

25

व्हिटॅमिन बी 3 जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व्हिटॅमिन बी 3 कार्य करते. UVA आणि UVB मुळे त्वचेवर पिगमेंटेशनची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आहारात व्हिटॅमिन बी3चा समावेश केला तर डागांपासून सुटका मिळेल.

35

व्हिटॅमिन सी - हे तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट पातळी वाढवते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेचे नुकसान जलद कमी होते. हे सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर फोटो डॅमेजचा परिणाम कमी करण्यास देखील मदत करते.

45

व्हिटॅमिन ई - व्हिटॅमिन ई त्वचेला चमकदार बनवण्यास आणि लवचिक ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा वृद्ध दिसत नाही, अतिनील किरणांच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची जळजळ टाळण्यासाठी कार्य करते. हे एक्जिमा इत्यादीसारख्या त्वचेच्या अनेक समस्या देखील बरे करू शकते.

55

व्हिटॅमिन के व्हिटॅमिन के रक्त गोठण्यापासून रोखण्याचे काम करते. याशिवाय त्वचा लवचिक ठेवण्यासाठी आणि काळी वर्तुळे दूर करण्याचे काम करते. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा चमकदार दिसते.

  • FIRST PUBLISHED :