NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कॉफी बियांचा असा वापर कधी ऐकला नसेल! फर्निचर, भांडी निघतील लख्ख

कॉफी बियांचा असा वापर कधी ऐकला नसेल! फर्निचर, भांडी निघतील लख्ख

कॉफी थकवा घालवण्यासाठी प्यायली जाते. विविध पदार्थांमध्ये कॉफी फ्लेवर वापरला जातो. पण, कॉफी आणखी वेगळ्या प्रकारे वापरायची पद्धत काही जणांना माहितीच नाही...

19

कॉफी पावडर लाकडी फर्निचर पुसण्यासाठीही वापरत येते. थोडी कॉफी वापडर आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. ही पेस्ट फर्निचरवर लावा आणि थोड्यावेळाने पुसून टाका. यामुळे डाग जाऊन फर्निचरची चमक परत येईल शिवाय ओरखडेही कमी दिसतील.

29

कॉफीच्या बियांमध्ये एक वेगळा सुगंध असतो. घरात ओलसरपणा,कचऱ्याचा वास किंवा कांदा-लसूणाचा वास पसरला असेल तर, तो दूर करण्यासाठी कॉफी उत्तम काम करते.

39

त्यासाठी कॉफीच्या बिया दुर्गंध येणाऱ्या ठिकाणी ठेवा किंवा कॉफी पावडरही ठेवू शकता. मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदासाठी कॉफीच्या बिया गरम करून वापरा.

49

कॉफीच्या बिया खराब झाल्या असती आणि फेकायची इच्छा नसेल तर, त्यांचा वापर भांडी घासण्यासाठी करता येतो. त्यासाठी कॉफीच्या बिया बारीक करा. ती पावडर भांड्यांवर टाका आणि नेहमी प्रमाणे घासा. कॉफी पावडर स्क्रबरचं काम करेल.

59

घरात किडे,मुंग्या किंवा डास वाढले असतील तर, कॉफी वापरता येते. कोणत्याही रासायनिक कीटकनाशकापेक्षा हे चांगलं आहे. कॉफीचा सुगंध आपला मूड रिलॅक्स होण्यास मदत होते.

69

कॉफी पावडर गुलाबाच्या झाडांसाठी खूप चांगलं खत म्हणून काम करू शकतं. त्यात नायट्रोजन आहे, ज्याचा झाडांना फायदा होतो. पण, बाजारातली कॉफी पावडर वापरण्यापेक्षा घरात कॉफीच्या बिया बारीक करुन वापराव्यात.

79

रोपाभोवतालची माती थोडीशी काढून त्यात 1 ते 2 चमचे कॉफी पावडर टाकावी. सर्वच झाडांसाठी कॉफी पावडर खत म्हणून वापरता येते.

89

घरात कॉफी बिया असतील तर, त्याचा वापर सजावाटीसाठी करता येतो. कॉफीच्या बिया दिसायला खूप छान असतात.

99

शोपीस, कॅन्डल होल्डर, फ्लॉवर पॉट यावर त्या लावता येतात. घरात असलेल्या कॉफीच्या बिया खराब झाल्या असतील तर, त्या फॉवर पॉटमध्ये भरून ठेवू शकता. त्यामुळे सगळीकडे सुवास दरवळेल.

  • FIRST PUBLISHED :