नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : पावसाळ्यात (Reany Season) जसे आजारपण वाढतात तसंच, घरात किडे येण्याचा त्रासही वाढतो. हे किटक पावसाळ्यात घरात येतात. लाईट भोवती फिरतात त्यातही बारीक किडे आणि पतंगांचा (Moths) थवा लाईट भोवती फिरत राहतात. घरात ज्या ठिकाणी लाईट (Light) लागेल तिथेच ते येतात. काम करताना, स्वयंपाक (Cooking) करताना अगदी जेवणाच्या ताटातही पडतात. त्यामुळे घाण वाटते. घरी आल्यावर सुखाने जेवण करण्याचीही मुभा राहत नाही इतका त्रास हे किटक देतात. काही घरांमध्ये या किटकांचा त्रास इतका असतो की, लाईट लावयलाही भीती वाटते. तुम्हीसुद्धा घरात येणाऱ्या या किटकांना त्रासला असाल तर, काही उपाय करून पाहा. थोडावेळ लाईट बंद करा हे किडे प्रकाशाजवळ जमतात. संध्याकाळी घरात लाईट लागताच किडे आणि पतंग घरात येऊ लागतात. अशावेळी सोपा उपाय करा. घरातले सगळे लाईट बंद करा आणि घराबाहेर बाल्कनी,पोर्च किंवा बागेतले लाईट सुरू करा. म्हणजे तो उजेड पाहताच सगळे कीटक आणि पतंग घराबाहेर पळून जातील तिथल्या लाईटजवळ गोळा होतील. (नको ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरगुती उपायांनीच जातील चेहऱ्यावरचे डाग) घराच्या खिडक्या आणि दार बंद करा संध्याकाळी घरात किडे आणि पतंग शिरण्याआधी बाल्कनी, पोर्च, व्हरांडा किंवा बागेत ज्या भागात लाईट लवा म्हणजे किटक तिथे जमा होतील. किटक तिथे जमले की घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद केरा यामुळे, कीटक आणि पतंग घराच्या आत येऊ शकणार नाहीत. बाहेरचे दिवे सुरू केल्यानंतर खिडक्या आणि दरवाजे बंद केल्यावरच घरातले लाईट सुरू करा. यामुळे, कीटक आणि पतंग घराच्या आत परत येऊ शकणार नाहीत. (अफगाणिस्तानात झाला सत्ता पालट पण, तालिबानमुळे भारतीयांच्या जेवणातली फोडणी महागली) बल्ब आणि ट्यूब लाईट स्वच्छ करा जशी घरात स्वच्छता केली जाते. तशीच किंवा किमान आठवड्यातून 30 ते 4 वेळा बल्ब आणि ट्यूब लाईटची स्वच्छता करत रहाणं आवश्यक आहे. त्यांच्यावरील जमलेली धूळ, घाण कीटक आणि पतंगांनाही आकर्षित करते. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस घाला त्यात व्हिनेगर मिसळा. या मिश्रणात एक सूती कापड बुडवून ते चांगलं पिळून घ्या. (अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे; डायबेटीस, BP सुद्धा राहील नियंत्रणात) यानंतर बल्ब किंवा ट्यूबलाईट स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा एकदा कोरड्या कापडाने पुसून टाका. या प्रकारे स्वच्छता करण्याआधी लाईट बंद करा. पुसल्यावर बल्ब आणि ट्यूबलाईट पूर्णपणे कोरडं असल्याची खात्री झाल्यावरच स्विच सुरू करा. शक्य असल्यास बल्ब आणि ट्यूब लाईट बाजुला काढून स्वच्छ करा.