NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Visa Free Destinations: या देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात भारतीय!

Visa Free Destinations: या देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात भारतीय!

ज्यांना वेगवेगळे राज्य, देश फिरायला आवडतात त्यांच्यासाठी Visa Free Destinations ही एक पर्वणीच आहे.

15

ज्यांना वेगवेगळे राज्य, देश फिरायला आवडतात त्यांच्यासाठी Visa Free Destinations ही एक पर्वणीच आहे. सर्दी असो किंवा गरमी कोणत्याही ऋतूत फिरण्याची तयारी दाखवणाऱ्या खऱ्या ट्रॅव्हलर्ससाठी आम्ही अशा काही देशांची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असेल. जाणून घ्या असे काही अफलातून देश जिथे भारतीयांना व्हिसाची गरज लागत नाही.

25

जमैका- या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. इथे तुम्ही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद लुटू शकता. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या देशात अनेक बीच आहेत आणि प्रत्येक बीचची स्वतःची अशी ओळख आहे. व्हिसाशिवाय तुम्ही इथे 14 दिवस राहू शकता.

35

फिजी द्वीपसमूह- वेगवेगळे देश पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी याहून चांगला पर्याय असूच शकत नाही. इथे व्हिसाशिवाय भारतीय तब्बल 120 दिवस राहू शकतात. इथे सांस्कृतिक परंपरांना मानणारे लोक राहतात. इथे कोरल रीफ्सही आहेत जे पाहून तुम्ही मंत्रमुग्ध झाला नाहीत तरच नवल.

45

सामोआ- निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असं हे बेट आहे. जर तुम्हाला काही वेगळ आणि अद्वितीय पाहायचं असेल तर इथे नक्की जा. इथले पुरुष महिलांप्रमाणे स्कर्ट घालतात. एवढंच नाही तर इथले लोक जमिनीच्या आत जेवण तयार करतात. इथे अनेक धबधबे आहेत जे इथल्या सौंदर्याला अजून व्यापक रूप देतात. इथे व्हिसाशिवाय 60 दिवस राहू शकता.

55

कुक बेट- व्हिसाशिवाय इथे 13 दिवस राहता येऊ शकतं. इथे तुम्ही ट्रेकिंग, पोहणं, धबधबे तसेच पारंपरिक डान्सचा मनमुराद आनंद लुटू शकता.

  • FIRST PUBLISHED :