पदार्थांची उकळी रोखण्यासाठी : स्वयंपाक करताना बर्याच वेळा भांड्यातून उकळी येऊ लागते. त्यामुळे तुमचा गॅसही घाण होतो. अशावेळी पदार्थांवर भांडं झाकण्याआधी एका कडेला टूथपिक लावा. यामुळे वाफ येत राहते आणि उकळी लगेच बाहेर पडणार नाही. (इमेज-कॅनव्हा)
बागकामात वापरा: बागेतील लहान रोपांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही टूथपिक वापरू शकता. छोट्या वनस्पतींना सपोर्ट देण्यासाठी म्हणून वापरू शकता. तसेच आपण सुरवंटांपासून रोपाचे संरक्षण करण्यासाठी झाडांभोवती टूथपिक्स लावू शकता. (इमेज-कॅनव्हा)
कोपरे स्वच्छ करा : घराचे कोपरे साफ करण्यापासून ते रिमोट, फोन आणि लॅपटॉपच्या बटणांमध्ये साचलेली घाण काढण्यापर्यंत तुम्ही टूथपिकची मदत घेऊ शकता. त्याच वेळी, टूथपिकचा वापर हेडब्रश आणि शॉवरहेड्स स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. (इमेज-कॅनव्हा)
माचिसची काडी मोठी करता येते : बऱ्याचदा माचिसची काडी लहान असल्यानं ती पेटवताच विझू शकते. अशा स्थितीत टूथपिक वापरून तुम्ही माचिसची काढी मोठी करू शकता. यासाठी टूथपिकला माचिस स्टिकने मागे जोडा. याचा उपयोग बाहेर कुठेही चूल पेटवणे, जाळ करताना केला जाऊ शकतो. (इमेज-कॅनव्हा)
स्वयंपाक करताना वापरा : सॉसेज, हॉट डॉग आणि ट्यूबलर काहीवेळा स्वयंपाक करताना ग्रिलवर नीट राहत नाहीत. त्यामुळे पदार्थ कच्चे राहतात. त्यासाठी आपण टूथपिक वापरून सर्वकाही स्थिर ठेवू शकता. तसेच, स्वयंपाक केल्यानंतर, तुम्ही टूथपिक धरून एकाच वेळी ग्रिलमधून सर्व गोष्टी बाहेर काढू शकता. (इमेज-कॅनव्हा)
फर्निचर रंगवा: फर्निचरमधील ओरखडे आणि छिद्रे कलर करण्यासाठी तुम्ही टूथपिक वापरू शकता. यासाठी टूथपिक पेंटमध्ये बुडवून स्क्रॅच आणि भोकांमध्ये भरा. यामुळे तुमच्या फर्निचरला नवीन आणि स्टायलिश लुकही मिळेल. (इमेज-कॅनव्हा)