NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा

दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा

मोठ्या प्रमाणामध्ये तोंडामध्ये सफेद रंगाचे डाग (White Patch) तयार झाले असतील तर हे HIV किंवा कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

19

आपलं शरीर स्वस्थ राहण्यासाठी शरीराबरोबर दातांची स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची आहे. कारण आपण जे अन्न आपण खातो ते आपल्या तोंडावाटे शरीरामध्ये जात असतं. यामध्ये दातांचं काम सर्वात महत्त्वाचं असतं. प्रत्येक माणसाला दात आणि हिरड्यांशी संबंधित त्रास वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर होत असतात.

29

UK मधल्या प्रसिद्ध डेन्टिस्ट डॉक्टर हैन्ना केन्सिल आणि कामिला अजिमोवा यांच्यामध्ये दात आणि हिरड्यांशी संबंधित आजार काही गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात.

39

हिरड्यांमधून रक्त येत असेल तर हे हार्मोन इम्बॅलन्स लक्षण असू शकतं. ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येत असेल तर याचा अर्थ हिरड्यांवर सूज आलेली आहे आणि आपला हार्मोनल बॅलन्स बिघडला आहे असा होतो. महिलांमध्ये मोनोपॉच्या काळामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतो. त्यामुळे वेळीच उपचार नाही घेतले तर गंभीर त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय हिरड्या कमजोर झाल्यामुळे दातांच्या ही समस्या सुरू होतात.

49

डॉक्टरांच्या मते हिरड्यांवर लाल रंगाची गाठ येणे हे गर्भधारणेचे लक्षण आहे. गर्भधारणेच्या काळामध्ये शरीरात वेगाने हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे कधीकधी हिरड्यांमधून रक्त देखील येऊ शकतं. डिलिव्हरी नंतर अशा प्रकारची गाठ बरी होते.

59

डॉक्टरांच्या मते फ्लॅट टीथ म्हणजे दात पूर्णपणे सपाट वाटणं हेच तणावाचं लक्ष असू शकतं. स्ट्रेस वाढल्यामुळे आपण दात चावतो आणि त्यामुळे दातांची झीज होऊ शकते.

69

तोंडामध्ये सफेद पॅच दिसायला लागला तर, स्मोकिंगचा परिणाम होत असल्याचं समजावं. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तोंडामध्ये सफेद रंगाचे डाग तयार झाले असतील तर हे HIV किंवा कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अशा दागांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

79

सेन्सिटिव्हिटी असेल तर, सतत मळमळ-उलटी सारखं वाटू लागतं. गर्भधारणेच्या काळामध्ये हायपरमेसिस मुळे पोटामध्ये ऍसिडिटी वाढायला लागते. यामुळे दात सेनन्सेटीव्ह होतात. मात्र सेन्सिटिव्हिटीमुळे दातांच्या वरच्या भागाला नुकसान होऊ शकतं. उलटी केल्यानंतर त्वरीत दात ब्रश करू नयेत.

89

तोंडामध्ये फोड येत असतील तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. हिरड्यां यांच्यावरती ट्यूमर तयार होत असेल तर, हे ओरल कॅन्सरचं लक्षण आहे. अशा प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

99

जिभ लाल होत असेल तर याचा अर्थ शरीरात आयर्नची कमतरता आहे. अ‍ॅनेमियामुळे जीभ लाल होऊन सूज जायला लागते. याशिवाय वेदनाही होतात. जिभेची त्वचा फाटू शकते. याकरता त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.

  • FIRST PUBLISHED :