NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Kitchen Tips : भांड्यांना अंड्याचा वास येतोय? या सोप्या उपायांनी सहज दूर होईल दुर्गंधी

Kitchen Tips : भांड्यांना अंड्याचा वास येतोय? या सोप्या उपायांनी सहज दूर होईल दुर्गंधी

अंड्याचा वास बऱ्याच जणांना आवडत नाही. पण घरामध्ये कित्येकदा अंडी उकडल्यानंतर किंवा अंड्याचा वापर करून एखादा पदार्थ बनवल्यानंतर, तो पदार्थ ज्या भांड्यात बनवला आहे, त्या भांड्यालादेखील त्याचा वास येऊ लागतो, जो भांडं कितीही स्वच्छ केले तरीही पट्कन जात नाही. अशावेळी काय करावं समजत नाही. पण काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहेत, ज्या भांड्याना येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी उपयोगी ठरतील. ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: May 29, 2023, 15:23 IST
16

स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी मदत करतील. चला तर, हे पदार्थ नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ.

26

भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे व्हिनेगर टाकून ठेवावे लागेल. मग थोड्या वेळाने ते भांडं स्वच्छ पाण्याने धुवावे लागेल. त्यामुळे अंड्याचा वास काही मिनिटांमध्ये गायब होईल.

36

भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरू शकतो. त्यासाठी अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यात बेकिंग सोडा आणि डिशवॉशर घालून ते दहा मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. त्यानंतर भांडं पाण्यानं स्वच्छ करा. त्यामुळे भांड्याला येणारी दुर्गंधी दूर होईल आणि भांडं व्यवस्थित स्वच्छ होईल.

46

अंड्याचा वास दूर करण्यासाठी चहा पावडरचा वापर करता येईल. त्यासाठी चहा केल्यांनतर गाळलेली चहा पावडर राखून ठेवा. ही पावडर अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यामध्ये काही वेळासाठी राहू द्या. काही वेळाने ती चहा पावडर फेकून द्या, व भांडं धुवा. अंड्याचा वास गायब होईल.

56

लिंबाचा रस आणि मीठाचा वापर करुन भांड्याला येणारा अंड्याचा वास दूर करू शकता. लिंबामध्ये असलेलं सायट्रिक अॅसिड तुमचं काम सोपं करु शकतं. लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करुन ते मिश्रण भांड्यांला लावून भांडं काही वेळ भिजत ठेवा. मग भांडं धुवा. त्यामुळे भांड्याला येणारा अंड्याचा वास जाईल, शिवाय भांडं अगदी स्वच्छ होईल.

66

लक्षात ठेवा, अंड्याचा वास येणाऱ्या भांड्याला स्वच्छ करण्यासाठी व त्यामधून येणारा दुर्गंध घालवण्यासाठी, ही भांडी धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. अशा पाण्याने भांडं साफ केल्यामुळे भांड्यातून येणारा अंड्याचा वास गायब होईल.

  • FIRST PUBLISHED :