NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय मोडायचीये? मग या टिप्स नक्की ट्राय करा

मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय मोडायचीये? मग या टिप्स नक्की ट्राय करा

सध्या मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलं देखील मोबाईल फोनच्या आहारी जाऊ लागली आहेत. अगदी लहान वयात त्यांच्या हातात मोबाईल, टीव्ही सारखे आधुनिक उपकरण आल्याने याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतात. अनेक घरातील लहान मुलं मोबाईल फोन पाहिल्याशिवाय नीट जेवत देखील नाहीत आणि त्यामुळे पालकांची चिंता देखील वाढू लागली आहे. तेव्हा मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय मोडण्यासाठी दिलेल्या काही टिप्स नक्की उपयोगी पडतील.

15

मुलांचे रुटीन बदलणे : जेव्हा तुमची मुलं स्वतःहुन त्यांच्या सवयी बदलत नाहीत तेव्हा आपण त्यांचे रुटीन बदलणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. यादरम्यान मुलांना शक्य तितकं इतर गोष्टींमध्ये बिझी ठेवा. मुलं इतर खेळात अथवा कोणत्याही गोष्टीत जेवढी जास्त बिझी राहतील तशी ती हळूहळू सतत मोबाईल फोन पाहणं बंद अथवा कमी करतील. मुलांना त्यांच्या आवडत्या आणि भविष्यात त्यांना कामी येतील अशा छंदामध्ये गुंतवले पाहिजे. यामुळे नक्कीच फायदा होऊन मुलांना लागलेले मोबाईलचे व्यसन कमी होईल.

25

मुलांमध्ये भीती निर्माण करा : मुलांच्या मनात एखाद्या गोष्टी विषयी भीती निर्माण करणे हा जरी एक उत्तम मार्ग असला तरी तो प्रत्येक मुलावर उपयोगी येईलच असे नाही. या प्रकारात तुम्ही मुलांच्या मनात सतत मोबाईल , टीव्ही पाहण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची भीती निर्माण करू शकता. ही भीती अनेकदा मुलांच्या मनावर परिणाम करताना दिसून येते.

35

मैदानी खेळांची आवड : निरीक्षणानुसार अधिकतर मोबाईल, टीव्ही पाहाण्याची सवय त्या मुलांना असते जी मुलं एकलकोंडी आणि सतत घरीच असतात. अशावेळी मुलांना सतत मोबाईलची लागलेली सवय सोडवण्यासाठी त्यांच्यात मैदानी खेळ खेळण्याची आवड निर्माण करा. एकदा का मुलाला स्वतःहुन खेळाची आवड लागली तर आपसूकच त्याची मोबाईल, टीव्ही पाहण्याची सवय निघून जाईल.

45

वाचनाची आवड निर्माण करा : लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. तुम्ही लहान मुलांची ही आवड ओळखून त्यांना रंजक गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय लावायला हवी. वाचनाची सवय ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्यांचे कधीच नुकसान होणार नाही उलट यामुळे त्याच्या बुद्धीत भर पडेल.

55

कमीत कमी गॅजेट्सचा वापर : मुलांना मोबाईल आणि टिव्ही पाहण्यासोबतच अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या अति वापराची सुद्धा सवय लागू शकते. त्यामुळे शक्य तितक्या प्रकारे मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून दूर ठेवावे. जर त्यांच्या पर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोहोचलेच नाही तर त्यांना त्यांच्या वापराची सवयच लागणार नाही आणि त्यांच्याकडून अतिवापर होणार नाही.

  • FIRST PUBLISHED :