न्यूयॉर्कमध्ये एक विचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात टॉयलेट पेपरपासून लग्नाचा ड्रेस तयार करण्याची ही स्पर्धा होती. अशीही काही स्पर्धा असते हे अनेकांना याचमुळे कळलं. यातही एका महिलेने टॉयलेट पेपरने वेडिंग ड्रेस तयार करून सात लाख रुपये जिंकले.
या अनोख्या स्पर्धेत एकूण 1 हजार 500 लोकांनी भाग घेतला होता. यातील 10 स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले.
दक्षिण कॅरोलिना येथील मिमोजा हास्क ही या स्पर्धेची विजेती ठरली.
मिमोजाने 48 टॉयलेट पेपरचा वापर करून 400 तासांमध्ये हा लग्नाचा ड्रेस तयार केला. हाच या स्पर्धेतील सर्वोत्तम ड्रेस ठरला.
ही स्पर्धा जिंकल्याबद्दल मिमोजाला एकूण सात लाख रुपयांचं बक्षिस मिळालं.
एवढंच नाही तर ही स्पर्धा अमेरिकेतील एका राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती. जागतिक दर्जाचे अनेक सेलिब्रिटी ही स्पर्धा पाहायला आले होते.