NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / चेहऱ्यावर घरगुती उपाय करताना अशी घ्या काळजी; तुमच्यावरून हटणार नाही कोणाची नजर

चेहऱ्यावर घरगुती उपाय करताना अशी घ्या काळजी; तुमच्यावरून हटणार नाही कोणाची नजर

नितळ त्वचेसाठी स्क्रब करणं फायदेशीर ठरतं. योग्य पद्धतीने स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. स्कीनसाठी घरगुती उपाय करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पाहुया.

17

चेहरा सुंदर राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोणतंही प्रॉडक्ट (Product) वापरताना किंवा होम रेमेडीज करताना त्या आपल्या चेहऱ्याला सूट होतात का? हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.

27

एखादा फेस पॅक किंवा स्क्रब लावण्याची योग्य पद्धत असते. योग्य पद्धतीने चेहऱ्याची काळजी न घेतल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

37

डेड स्कीन (Dead Skin) निघून जाण्यासाठी आणि त्या जागेवर नवीन त्वचा (New skin) येण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब (Scrub)केलं जातं. आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करणंही महत्त्वाचं आहे.

47

प्रत्येकाने योग्य पद्धतीने स्क्रब करण्याची माहिती घेतली पाहिजे. चेहऱ्यावर स्क्रबिंग करण्याचं योग्य वय 25 आहे. 25 पेक्षा कमी वयाच्या लोकांनी स्क्रॅब करू नये.

57

चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब लावावं. ड्राय स्किन असलेल्यांनी आठवड्यातून एकदा आणि ऑयली स्किनवर दोन वेळा स्क्रब मसाज करणं आवश्यक आहे. स्क्रब लावताना चेहऱ्यावरचा मेकअप काढावा किंवा चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

67

स्क्रब चेहऱ्यावर थेट वापरू नयेत, स्क्रबमध्ये पाणी मिसळून चेहऱ्यावर लावावा.10 ते 20 सेकंद पेक्षा जास्त वेळ स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करू नये. घरगुती स्क्रब म्हणून संत्र्याची साल, पपईच्या बिया आणि साखर किंवा तांदळाचं पीठ यांचाही वापर केला जातो.

77

चेहरा स्क्रब केल्यानंतर नेहमीच चेहऱ्यावरती टोनर लावणं आवश्यक आहे. घरगुती टोनर लावायचं असेल तर, टोमॅटो, काकडी, पपई यांचा रस किंवा गर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय बाजारामध्ये देखील चांगल्या प्रतीचे टोनर उपलब्ध आहेत.

  • FIRST PUBLISHED :