NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Morning Weight Loss Drinks: बेली फॅटला फास्ट कमी करतात ही ड्रिंक्स; तुम्हीही वापरून पाहा परिणाम

Morning Weight Loss Drinks: बेली फॅटला फास्ट कमी करतात ही ड्रिंक्स; तुम्हीही वापरून पाहा परिणाम

धावपळीच्या जीवनशैलीत आजकाल अनेक लोक पोटाच्या वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त आहेत. विविध प्रकारचे व्यायाम करणं, खाण्या-पिण्यावर नियंत्रण आणूनही काही लोकांना चांगला परिणाम दिसत नाही. महिनाभर व्यायाम केल्यानंतर तुमचं वजन फक्त एक किलोनं कमी झालं तर तुम्ही आनंदी व्हाल का? कदाचित नाही, आजकाल प्रत्येकजण झटपट परिणामांवर विश्वास ठेवतो. आज आपण काही अशा पेयांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे चयापचय वाढते. तुम्ही ही पेय सकाळी पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास, पोटाचा घेर कमी करण्यास आणखी मदत होईल. ही पेय सकाळी लवकर पिणं चांगलं आहे कारण यावेळी चयापचय चांगल्या पातळीवर असतं.

15

1) ओव्याचं पाणी ओवा चयापचय वाढवण्यास मदत करतो. ओव्यामुळं पचनशक्ती वाढते आणि पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यास मदत होते. पेय तयार करण्यासाठी, दोन चमचे भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून प्या किंवा तसंही पिऊ शकता.

25

2) जिरे पाणी जिरे हा सर्व भारतीय भाज्यांमध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा मसाला आहे. जिरा पाणी हे कमी-कॅलरी पेय आहे, यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाची चरबी जाळण्यास मदत होते. यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. अनेक आहारतज्ञ व्यायामानंतर सकाळी जिरे पाणी पिण्याची शिफारस करतात.

35

3) ब्लॅक कॉफी कॉफीमध्ये कॅफिन असते जे तुमच्या उर्जेला त्वरित वाढ देते. चयापचय वाढवण्यास देखील ते उपयुक्त ठरते. ब्लॅक कॉफी हे प्री-वर्कआउट पेयांपैकी एक आहे. कारण ते तुम्हाला अधिक ऊर्जा देते, ज्यामुळे तुमच्या वर्कआउट सत्रात फायदा होतो. याव्यतिरिक्त, ते चरबी जलद बर्न करण्यास देखील मदत करते. मात्र, आपण ही कॉफी साखर न घालता प्यावी.

45

4) ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे केवळ पोटाची चरबी कमी होत नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. रोजच्या चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश देखील वाटेल.

55

5) बडीशेप पाणी बडीशेप पाणी पोट फुगणे आणि अपचनाच्या त्रासावर एक उत्तम उपाय आहे. बडीशेप शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. बडीशेप चयापचय वाढवण्यास मदत करते. बडीशेप पाणी तयार करण्यासाठी, एक चमचा बडीशेप पाण्यात मिसळा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून प्यावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :