NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / आयुष्याचं वाटोळं व्हायला या 3 गोष्टीसुद्धा आहेत पुरेशा; वेळ निघून गेल्यानंतर अनेकांना कळतं

आयुष्याचं वाटोळं व्हायला या 3 गोष्टीसुद्धा आहेत पुरेशा; वेळ निघून गेल्यानंतर अनेकांना कळतं

आपल्या करिअर नोकरी-व्यवसायामध्ये खूप मोठे स्थान मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी लोक मेहनत करतात, स्वत:ला अपडेट ठेवतात. मात्र एवढे करूनही अनेकवेळा पात्रता असूनही लोकांना अपेक्षित यश मिळू शकत नाही. चाणक्य नीतीमध्ये यामागे काही कारणं सांगितली आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती अशा काही चुका करते, ज्यामुळे त्याच्या यशाच्या मार्गात नेहमी अडथळे येत राहतात. या चुका आपल्याला यशस्वी होऊ (Lifestyle Tips) देत नाहीत.

14

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाच्या यशाचा पाया त्याच्या तारुण्यातच घातला जातो. या काळात जर त्याने चांगले आचरण, मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केलं तर आयुष्यभर यश त्याच्या पायांशी लोटांगण घेतं. तो खूप नाव कमावतो आणि अफाट संपत्तीचा मालक बनतो. तर तारुण्यात झालेल्या काही चुका त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि मग फक्त पश्चाताप त्याच्या हातात राहतो.

24

व्यसनाधीनता : अंमली पदार्थांचे व्यसन माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करूनच सोडतं. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आपले वैयक्तिक आणि कामाचे आयुष्य उद्ध्वस्त होतं. जे तरुण वयातच ड्रग्ज घेण्यास सुरुवात करतात, ते आयुष्यात खूप मागे राहतात. ते पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत आणि नावही कमवू शकत नाहीत.

34

आळस : आळस ही खूप वाईट गोष्ट आहे, आळसामुळे सक्षम व्यक्तीची प्रतिभा देखील नष्ट होते. तारुण्यातला आळस आयुष्य उद्ध्वस्त करतो. हे असे वय असते जेव्हा माणूस पूर्ण उर्जेने काम करतो आणि आपले भविष्य चांगले करण्यासाठी रात्रंदिवस एक करतो. तर आळशीपणामुळे तो त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा काळ गमावतो आणि नंतर त्याला आयुष्यभर पश्चाताप होतो.

44

वाईट संगत : वाईट संगती माणसाला त्याच्या ध्येयापासून भरकटवतात. आपले काम, ध्येये सोडून तो अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू लागतो. तारुण्याचा मौल्यवान वेळ वाईट संगतीत वाया जातो. वाईट संगतीमुळं एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बरबाद झाल्याचे तुम्ही पाहिले असेल, त्यामुळे चांगल्या लोकांची संगत महत्त्वाची आहे.

  • FIRST PUBLISHED :