होळीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खाऊन पोट बिघडतं. अशावेळी थंडाई प्यायल्याने तुमच्या पोटाला आराम मिळतो. पोटात जळजळ, मलावरोध, गॅस अशा समस्यांपासून मुक्तता मिळते.
थंडाई शरीरालाही थंड ठेवते. ड्राय फ्रुट्स घालून थंडाई बनवल्यास डोकं शांत राहतं.
उत्तर भारतात जास्त करून थंडाईमध्ये बडीशेप टाकलं जातं. बडीशेफमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असतात, ज्यामुळे तुम्ही काहीही खाल्लं तरी पोटाच्या समस्या उद्भभवणार नाहीत.
काही ठिकाणी थंडाईमध्ये टरबूजाच्या बिया टाकल्या जातात, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अशी थंडाई एक ग्लास प्यायल्यात तरी दिवसभर तुम्ही अक्टिव्ह राहता.
मसालेदार थंडाईसाठी लोकं त्यामध्ये काळी मिरी आणि लवंगाची पूड टाकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
काही ठिकाणी होळीमध्ये थंडाईत केसर घातलं जातं. त्यामुळे ही थंडाई अँटी-डिप्रेशन आणि अँटीऑक्सिडंटचं काम करते.