अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अळू व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, फोलेट तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज या पोषक गुणांनी भरपूर आहे.
अळूची पाने ही हायपरटेनसीव्ह आहेत. त्यामुळे अळूच्या भाजीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात येते.
अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते.
अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असलयाने याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळून वजन कमी करण्यास मदत होते.
अळूच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी ही तीक्ष्ण होते.
अळूच्या पानांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटामिन ए आढळते त्यामुळे हाडांसंबंधीत आजारांपासून मुक्तता मिळते.
अळूच्या पानांमध्ये पोषकतत्व असल्याने त्याचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो.