सध्या मार्केटमध्ये वेस्टर्न आऊटफिटवर देखील सुंदर दिसतील अश्या स्टायलिश मंगळसूत्र डिझाइन्स उपलब्ध आहेत.
अनेक वर्किंग वुमन्सना दररोज वापरता येतील असे लहान मंगळसूत्र हवे असतात.
सध्या बाजारात अनेक वजनाला हलके आणि विविध आकाराचे डिझाईन्स उपलब्ध आहेत.
सध्या अनेक मालिकेत देखील अभिनेत्री नवनवीन डिझाइन्सचे मंगळसूत्र घातलेल्या दिसतात.
सध्या डायमंडचे मंगळसूत्र देखील महिलांच्या अधिक पसंतीस उतरत आहेत.
तसेच लहान मंगळसूत्रांमध्ये साऊथच्या डिझाईन्स देखील बऱ्याच पॉप्युलर होत आहेत.
नववधूंमध्ये सध्या नावाच्या मंगळसूत्रांची क्रेज आहे. यात मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये पती पत्नीचे नाव लिहिले जाते.
मंगळसूत्राची ही डिझाईन सध्या महिलांच्या पसंतीस उतरत आहे.