NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Skin Care In Summer: उन्हाळ्यात घरच्या-घरी तयार करा दह्याचे हे 5 फेसपॅक; दिसाल स्मार्ट-ग्लोइंग

Skin Care In Summer: उन्हाळ्यात घरच्या-घरी तयार करा दह्याचे हे 5 फेसपॅक; दिसाल स्मार्ट-ग्लोइंग

Skin Care Tips For Summer: उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात. दही देखील यापैकीच एक आहे. दही हा काही लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, पौष्टिकतेने समृद्ध दह्याचा फेस पॅक चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त आहे. वास्तविक, दह्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्या घालवण्यात प्रभावी आहेत. त्याचबरोबर लॅक्टिक अॅसिड, झिंक आणि मिनरल्स हे गुणधर्म असलेले दही चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंगसारख्या समस्या कमी करून चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करते. चेहऱ्याच्या त्वचेसाठी उन्हाळ्यात दही फेस पॅक खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊया दही फेस पॅक बनवण्याच्या काही सोप्या पद्धतींबद्दल.

15

दही-मुलतानी माती फेस पॅक : त्वचेवरील टॅनिंग आणि सनबर्नमुळे होणारे प्रॉब्लेम्स घालवण्यासाठी दही आणि मुलतानी माती फेसपॅक लावणे ही एक अतिशय प्रभावी कृती आहे. बनवण्यासाठी एका वाडग्यात 1 चमचा दही, 2 चमचे मुलतानी माती पावडर आणि 1 टीस्पून एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट बनवा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर चांगला लावा आणि 15 मिनिटे वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर कापसाच्या मदतीने गुलाबपाणी हलकेच चेहऱ्यावर लावा.

25

दही-ओट्स फेस पॅक : दही आणि ओट्सचा फेस पॅक चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतो. बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात 1 चमचे ओट्स मिसळा आणि काही वेळ भिजवू द्या, त्यानंतर त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

35

दही-टोमॅटो फेस पॅक: दही आणि टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्याची पीएच पातळी राखून छिद्रे स्वच्छ ठेवतो. ज्यामुळे मुरुमे आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो. तो बनवण्यासाठी 1 चमचे दह्यात अर्ध्या टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 10-15 मिनिटे सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

45

दही-अंडी फेस पॅक : चेहरा उजळण्यासाठी अंडी आणि दही यांचे मिश्रण ही सर्वोत्तम कृती आहे. याशिवाय त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात अंड्याचा पांढरा भाग आणि 1 केळी मिसळा. आता त्यात 1 चमचा बेसन घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे सुकल्यानंतर चेहरा धुवा.

55

दही-मेथी बियांचा फेस पॅक: दही आणि मेथीच्या बियांचा फेसपॅक लावल्याने त्वचा अधिक तरुण दिसते. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील नाहीशा होतात. यासाठी 1 चमचे दह्यात 1 चमचा मेथी पावडर, अर्धा चमचा बदामाचे तेल आणि अर्धा चमचा गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर चांगले लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :