NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Cleaning Tips : एग्जॉस्ट फॅन खूप घाण झालाय? मग सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात करा चकाचक

Cleaning Tips : एग्जॉस्ट फॅन खूप घाण झालाय? मग सोप्या टिप्स वापरून काही मिनिटात करा चकाचक

घाण आणि अस्वच्छ असलेलया एग्जोस्ट फॅनची कार्यक्षमता कमी होते आणि कालांतराने तो खराब होऊ शकतो. तसेच अस्वच्छ असलेलया फॅनमधून धूर आणि दुर्गंध बाहेर फेकला जात नाही. तेव्हा घरातील एग्जोस्ट फॅन साफ करण्याचे काही सोपे उपाय आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

17

प्रत्येक घराच्या किचनमध्ये एग्जॉस्ट फॅन लावलेला असतो. या एग्जॉस्ट फॅनच्या मदतीने घरातील धूर आणि दुर्गंध बाहेर पडण्यास मदत होते. परंतु अनेकदा हा फॅन उंचावर असल्याने बरेचजण हा फॅन स्वच्छ करण्यास कंटाळा करतात त्यामुळे हा फॅन तेलकट आणि चिकट होतो. बराचकाळ फॅन स्वच्छ न केल्याने त्यावर धूळ आणि कचरा चिकटून फॅन अतिशय घाण होतो.

27

घाण आणि अस्वच्छ असलेलया एग्जोस्ट फॅनची कार्यक्षमता कमी होते आणि कालांतराने तो खराब होऊ शकतो. तसेच अस्वच्छ असलेलया फॅनमधून धूर आणि दुर्गंध बाहेर फेकला जात नाही. तेव्हा घरातील एग्जोस्ट फॅन साफ करण्याचे काही सोपे उपाय आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

37

अनेकदा एग्जॉस्ट फॅनवर लावलेली जाळी खराब होते. तसेच जाळीवरील भोक तेलामुळे ब्लॉक होऊन जातात. तेव्हा ही जाळी साफ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी किंवा अमोनियाचा वापर करू शकता. गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया मिसळून एक पेस्ट तयार करा आणि त्यात एग्जॉस्ट फॅनची जाळी बुडवा. जवळपास 1 तास ही जाळी पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याला लागलेली घाण आणि चिकटपणा कमी होईल आणि जाळी काढल्यानंतर हलक्या हातांनी घासून घ्या जेणेकरून सर्व घाण जाळीतून निघेल आणि एक्जोस्ट फॅन व्यवस्थित काम करेल.

47

एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकता. गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया आणि २ चमचे बेकिंग सोडा मिसळून एक सोल्यूशन तयार करून घ्या. नंतर एक कापड या मिश्रणात ओला करून पंखा साफ करून घ्या आणि या कपड्याने पंखा स्वच्छ पुसून घ्या.

57

एग्जॉस्ट फॅनवरील चिकटपणा हटवण्यासाठी कॉस्टिक केमिकल्सचा देखील वापर करू शकता. बाजारातून आणलेले हे केमिकल तुम्ही गरम पाण्यात मिसळून एका स्प्रे बाटलीत ओता आणि नंतर पंख्याच्या ब्लेड्सवर स्प्रे करा. तसेच थोड्यावेळाने ब्लेड्स कापडाने स्वच्छ करा.

67

लहान स्टिम क्लिनरचा वापर करून तुम्ही एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करू शकता. घाणेरड्या भागावर गरम पाण्याचा स्प्रे करून स्वच्छ टॉवेलच्या मदतीनं पंखा स्वच्छ करा. व्हिनेगर, डिश वॉश लिक्विडच्या मदतीनंही तुम्ही एग्जॉस्ट फॅन आणि त्याची जाळी स्वच्छ करू शकता.

77

घाण झालेला एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणार सोडियम फॉस्फेट क्लिनर वापरू शकता. या सोल्यूशनचा वापर करताना हात आणि तोंड कव्हर करणं गरजेचं आहे. हा उपाय करताना तुम्ही मास्कचाही वापर करू शकता.

  • FIRST PUBLISHED :