सकाळी नाश्ता न करण्याची सवय बदला - गॅसचं एक मुख्य कारण पोट रिकामं (empty stomach)असणं हेसुद्धा असतं. अनेक लोक सकाळी नाश्ता करत नाहीत त्यामुळे रिकाम्या पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे नाश्ता चुकवू नका.
जास्त खाणंही टाळा - तुम्ही तुमच्या भुकेच्या गरजेहून जास्त खात असाल तरीही तुम्हाला गॅस होऊ शकतो. गरजेतून जास्त जेवाल तर ते पचायला वेळ लागतो. त्यातून पोटात गॅस तयार होतो.
तळलेलं खाणं कमी करा - तळलेलं जास्त आणि सतत खाल्यानंसुद्धा गॅस होतात. थंडीच्या दिवसात असं अन्न खाण्याचा मोह होऊ शकतो. मात्र शक्यतोवर टाळा किंवा क्वचितच खा.
सतत एकाच जागेवर बसू नका - सतत राहिल्यानं पोटात गॅस धरतो. सतत बैठं काम करणाऱ्यांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे. एकाच जागेवर बसल्यानं खाल्लेलं अन्न पचत नाही. त्यातून गॅसची समस्या उद्भवते. थोड्या-थोड्या वेळानं पाय मोकळे करण्याची सवय लावून घ्या.
काही घरगुती उपाय - कांद्याच्या रसामध्ये काळं मीठ आणि हिंग कुटून टाका. त्यातून गॅसेसपासून मुक्ती मिळेल. दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये (apple cider vinegar) मिसळून पिल्यानं आराम मिळतो. किंवा लिंबाचा रस आणि अद्रक एक-एक चमचा घ्या. मग त्यात थोडंसं काळं मीठ टाकून जेवल्यावर हे खा. मेथीदाणे आणि गूळ पाण्यात टाकून उकळा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर प्या, आराम मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)