दुधामध्ये पुष्कळ पोषक घटक आणि एंजाइम असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते. सहसा लोक उकळलेलं दूधच पितात. पण, बऱ्याच लोकांना गरम न केलेलं दूध प्यायलाही आवडतं. कच्चं दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे अशी धारणा आहे.
कच्च्या दुधात असे बरेच बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीरात पोहोचून रिअॅक्टिव आर्थराइटिस पासून डायरिया,डिहायड्रेशन, गुलियन-बॅरे सिंड्रोम आणि हीमोलिटिक यूरिमिक सिंड्रोम सारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात.
दूध काढताना ते दुषित घटकांच्या संर्कात आलेलं असू शकत.
इम्युनिटी कमजोर असणारे लोक, लहान मुलांना कच्चं दूध घेण्याने त्रास होऊ शकतो
त्यामुळे उलटी येणं, मळमळणं किंवा डायरिया होण्याची शक्यता खूप जास्त असते.
कच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.
कच्चं दूध घेतल्यास अॅसिडीटी वाढते. त्यामुळे डोकंही दुखू शकतं.
कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. ज्यामुळे बाहेरील घटकांशी संपर्कत येताच त्यात बॅक्टियरी वाढायला लगतो. त्यामुळे दूध खराब होतं.