कोरोना व्हायरसमध्ये लॉकडाऊनमध्ये चिंता, भीती, अस्वस्थता वाढली आहे. त्याच्याशी कशी मात करावी, यासाठी तुम्हीही सेल्फ केअर कशी करावी यासाठी या टीप्स.
सकाळी उठल्या उठल्याच तुमच्या डोक्यात ऑफिसचंच काम सुरू होतं का? तर तुम्हाला स्वत:ला वेळ देण्याची गरज आहे. उठल्यानंतर थेट ऑफिसचं काम करायला घेऊ नका. घरात हवेशीर ठिकाणी मेडिटेशन करा. थोडा वेळ डोळे बंद करून मन शांत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे नकारात्मक भावना दूर होतील.
सलग काम केल्यानं मनात एक भीती निर्माण होते. अशा काम करण्याची पद्धत थोडी बदला. कामात मध्ये मध्ये ब्रेक घ्या. एका विशिष्ट कालावधीत काम पूर्ण करा. ब्रेकमध्ये कामाचा विचार बिलकुल करू नका. या वेळेत चहा प्या, योगा करा, घरातल्या इतर सदस्यांशी बोला आणि पुन्हा नव्या ऊर्जेसह कामाला सुरुवात करा.
आपल्याला कोरोनाव्हायरस तर होणार नाही ना, अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सातत्यानं याचा वापर करा.
कामाच्या गडबडीत नाश्ता आणि जेवण टाळू नका. असं करणं हानिकारक ठरू शकतं. हवं तर ब्रेकफास्ट आणि लंचसाठी एक अलार्म लावून ठेवा. जेणेकरून तुम्हाला खाण्याची आठवण होईल.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल, तर कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे. त्यामुळे असा पोषक आहार घ्या, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा.
ऑफिसचं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गरज आणि क्षमतेपेक्षा जास्त कामाची जबाबदारी घेऊ नका. काम संपताच लॅपटॉप लगेच बंद करा आणि मोबाइलही जास्त वापरू नका. त्यापेक्षा स्वत:ला वेळ द्या.