NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / प्रेग्न्सीत कोरोना लस घेणं किती सुरक्षित? 18+ कोरोना लसीकरण सुरू होताच नवी माहिती समोर

प्रेग्न्सीत कोरोना लस घेणं किती सुरक्षित? 18+ कोरोना लसीकरण सुरू होताच नवी माहिती समोर

कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी लस (Vaccination) हा एक प्रभावी पर्याय आहे. मात्र गर्भवती महिलांनी कोरोना लस घ्यावी का याबाबत मनात अनेक शंका निर्माण होतात.

16

गर्भवती महिलांनी कोरोना लस घ्यावी का याबाबत मनात अनेक शंका निर्माण होतात. याचसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून रिसर्च (Recherche) सुरू होतं. त्यावरून एका निष्कर्षापर्यंत तज्ज्ञ पोहोचलेले आहेत. कोरोना लस गर्भवती महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

26

कोरोना लशीवर झालेल्या सोशंधनात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. कोरोना लसीकरण केल्यानंतर एखादी महिला गर्भवती झाली तर तिला गर्भधारणेच्या काळातही या लसीकरणाचा फायदा होणार आहे.

36

वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार ही लस गर्भावर कोणताही वाईट परिणाम करत नाही. उलट गर्भात वाढणाऱ्या बाळाही सुरक्षा देते. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाची रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

46

काही वैज्ञानिकांच्या मते गर्भावस्थेत कोरोना लस घेतल्याने वाईट परिणाम न झाल्याचं कोणतंही उदाहरण आतापर्यंत पाहण्यात आलेलं नाही. उलट कोरोना लस घेतल्याने वेळेआधी होणाऱ्या प्रसूतीचा धोका कमी होतो.

56

नोव्हेंबर महिन्यात फायझर या कंपनीने लहान मुलांना कोरोना लशीने कोणतंही नुकसान होणार नाही अशी घोषणा केली आहे. मात्र कंपनीने हेही स्पष्ट केलं आहे की, गर्भवती महिलांवर कोरोना लशीचं परिक्षण करण्यात आलेलं नाही.

66

ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचा धोका कमी करते. शिवाय कोव्हिड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्या मते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.

  • FIRST PUBLISHED :