ऑस्ट्रेलियाची फुल टाइम सुपरकार रेसर रेनी ग्रेसीनं अडल्ट स्टार होण्यासाठी कार रेसिंगला रामराम ठोकला आहे.
ग्रेसी V8 सुपरकार ड्रायव्हर होती. 2008 मध्ये पहिल्यांदा फुल टाइम सुपर कार रेसर झाली होती.
2015 पर्यंत तिनं खूप चांगली कामगिरी केली. 2017 नंतर ग्रेसीचे रिझल्ट कमी झाल्यावर तिला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं.
ग्रेसीचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. त्यामुळे तिनं ओनली फॅन्स साइटची मदत घेतली. ग्रेसीनं या वेबसाइटवर स्वतःचं अकाऊंट बनवलं आणि त्यावर आपले न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर विकायला सुरुवात केली.
सुरुवातीला यातून तिला एका आठवड्यात 3 हजार डॉलर्स मिळत असत. पण जशी तिच्या सब्सक्रायबरची संख्या वाढत गेली तसा तिला जास्त नफा होऊ लागला.
पैसा मिळवण्यासाठी आणि आर्थिक चणचण भागवण्यासाठी आपण अॅडल्ट स्टार व्हायचा निर्णय घेतला, असं रेनीने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.
या ऑस्ट्रेलियाच्या माजी रेसरने अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केल्यानंतर महिन्याभरातच 90000 डॉलर कमावले आहेत.