शेंगाची चटणी, कडक भाकरी हे पदार्थ म्हंटले की सोलापूरची हमखास आठवण होते. त्याचबरोबर सोलापूर शिकमुळे देखील प्रसिद्ध आहे.
मटण भाजण्याच्या खास पद्धतीला शीक असं म्हंटलं जातं. सोलापुरात येणारे पाहुणे सोलापुरी चादर घ्यायला आणि शीक मटण खायला कधी विसरत नाहीत.
शिकसाठी लागणारे मटण किंवा चिकन हे सुद्धा स्पेशल प्रकारात तोडावे लागते. प्रत्येक पीसच्या पृष्ठभागी छोटे-मोठे कट्स घ्यावे लागतात.अगदी स्वच्छ पाण्याने ते मटण प्रथम धुवून घ्यावे.
गरम मसाल्यांसोबत हे लावलेले मिश्रण दोन ते अडीच तास मॅरीनेट करून घ्यावेत. त्यानंतर एका लोखंडी सळईला व्यवस्थितपणे एका मागून एक असे पिसेस लावून घ्यावेत.
कोळशाच्या आरावर ते मटण भाजत असताना कोळशातून येणारी आग आणि मटणामध्ये असणारे मसाले हे व्यवस्थित भाजले जातील याची काळजी घ्यावी.
त्यानंतर गॅसवर एका पातेल्यात लोणी टाकून हे कोळशाच्या आरावरून भाजून काढलेले पीस आणि लोणी एकजीव करून घ्यावे.