पावसाळ्यात साखर आणि मीठ हे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये न ठेवता काचेच्या बरण्यांमध्ये ठेवा. याशिवाय साखर किंवा मीठ काढत असताना नेहमी सुक्या हाताने काढा. ओल्या हाताने पदार्थ काढताना तो ओलावा जर पदार्थाला लागला तर ती ओली होते.
साखरेला ओलसरपणा येऊ नये यासाठी साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाका. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल आणि साखर किंवा मिठामध्ये ओलावा राहाणार नाही.
साखर आणि मीठ दीर्घकाळ टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरचाही वापर केला जाऊ शकतो.
ब्लोटिंग पेपर ओलावा खेचून घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे बरणीमध्ये मीठ किंवा साखर भरण्यापूर्वी बरणीत ब्लोटिंग पेपर घाला. एवढंच नाही तर बिस्कीट, कुकीज आणि चिप्स मऊ पडू नयेत म्हणून देखील तुम्ही ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता.
पावसाळ्यामध्ये साखरेला आणि मिठाला ओलसरपणा येऊ नये म्हणून साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे त्याला ओलसरपणा सोबतच मुंग्या देखील येणार नाहीत.