NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Pune Market: लॅपटॉप अगदी कमी किंमतीत, पुण्यात या ठिकाणी खास ॲाफर...PHOTOS

Pune Market: लॅपटॉप अगदी कमी किंमतीत, पुण्यात या ठिकाणी खास ॲाफर...PHOTOS

Pune Market: पिंपरीत सेकंड लॉपटॉपचं जुनं मार्केट असून इथं स्वस्तात लॅपटॉप मिळतात.

  • -MIN READ

    Last Updated: July 01, 2023, 17:49 IST
17

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप ही काळाची गरज झाली आहे. ऑफिसच्या कामापासून ते शाळा कॉलेजच्या प्रोजक्टपर्यंत प्रत्येक कामासाठी लॅपटॉपची गरज पडतेच. पण अजूनही अनेकजण कमी बजेटमुळे चांगल्या कॉन्फिगरेशनसह लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत.

27

आर्थिक अडचणीमुळे चांगला लॅपटॉप खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडेमध्ये आपल्याला कमी किमतीत चांगल्या कॉन्फिगरेशनसह लॅपटॉप मिळतील.

37

पिंपरीतील शगुन चौक येथे जुने लॅपटॉप स्वस्तात मिळतात. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुम्ही या ठिकाणाहून लॅपटॉप खरेदी करू शकता. ऑफिस, बिझनेस किंवा ऑनलाईन स्टडीसाठी लॅपटॉपचा शोध इथं पूर्ण होऊ शकतो.

47

बजेट कमी असेल तरीही या ठिकाणी लॅपटॉपचे अनेक बेस्ट ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या प्रसिद्ध ब्रँडचे लॅपटॉप प्रोफेशनली चेक केलेले आहेत. तुम्ही हे लॅपटॉप अगदी निश्चिंतपणे खरेदी करू शकता. कारण लॅपटॉप वर्किंग कंडीशन मध्ये मिळत असून यावर सेलर द्वारे 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे.

57

हेवी डिस्काउंट सोबतच यावर आकर्षक बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही हे सेकंड लॅपटॉप अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. बाजारात अनेक दुकाने आहेत जी सेकंड हँड वस्तू विकतात. या प्रकरणात, खरेदी करण्यापूर्वी, इतर दुकानांमध्ये गॅझेटची किंमत पाहून घ्या.

67

लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आणि गॅजेट्सचे चांगले ज्ञान असलेल्या व्यक्तीला सोबत घ्या. कोणतेही उपकरण विकत घेण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करून घ्या. लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, तो काही काळ चालवा आणि डिव्हाइस व्यवस्थापकाकडे जा आणि त्याचे कॉन्फिगरेशन तपासून घ्या.

77

आपण घेतलेल्या लॅपटॉपची बॅटरी एकदा तपासा. काढण्यायोग्य बॅटरी असल्यास ती काढून चांगल्या स्थितीत आहे का ते पाहा. आपल्याकडे न काढण्यायोग्य बॅटरी असल्यास आपण त्यावरील सुमारे 5-15 मिनिटांसाठी HD व्हिडिओ पाहा. त्यानंतर बॅटरी डिस्चार्ज होते का तपासा. जर बॅटरी फक्त 15 मिनिटांत 50 टक्क्यांपेक्षा कमी झाली तर तो लॅपटॉप घेणं योग्य नाही, असा सल्ला माहितगारांनी दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :