NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सावधान! पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता व्हायरसचे शिकार; असा करा स्वत:चा बचाव

सावधान! पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता व्हायरसचे शिकार; असा करा स्वत:चा बचाव

महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus) धडकला आहे. पुण्यात (Pune) 5 रुग्ण आढळलेत. त्यामुळे या व्हायरसपासून तुम्ही स्वतःचा बचाव करा, आवश्यक ती काळजी घ्या.

16

हात स्वच्छ धुवा - साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. साबण नसल्यास हँड सॅनिटायझरचा वापर करा. यामुळे हातावरील व्हायरसचा नाश होतो.

26

डोळे, नाक, तोंडाला हातांनी स्पर्श करू नका - आपले हात अनेक गोष्टींना स्पर्श करतात, त्यावर व्हायरस असू शकतात. असे हात तुम्ही डोळे, नाक, तोंडासमोर नेलात तर व्हायरस तुमच्या शरीरात जाऊ शकतात.

36

सुरक्षित अंतर ठेवा - तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ असाल, तर त्या व्यक्तीपासून किमान 1 मीटर लांब राहा. जेणेकरून तुम्ही किंवा ती व्यक्ती शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर त्याचे थेंब तुमच्या श्वासातून शरीरात जाणार नाहीत.

46

शिंकताना, खोकताना नाक, तोंड झाकून घ्या - शिंक आणि खोकला आल्यानंतर तोंडावर रुमाल किंवा टिश्यू ठेवा. टिश्यू वापरल्यानंतर तो तात्काळ फेकून द्या. तुमच्यासमोरही एखादी व्यक्ती खोकत, शिंकत असेल तर तिलाही असं करण्यास सांगा.

56

सर्दी-खोकला-तापाकडे दुर्लक्ष करू नका - ही लक्षणं सामान्य समजू नका, कारण हीच कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि जास्त व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळा.

66

आजारी व्यक्तीपासून दूर राहा - सर्दी-खोकला-ताप असलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहू नका. शिवाय प्राण्यांपासूनही शक्यतो दूरच राहा.

  • FIRST PUBLISHED :