NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Long Life Tips: दीर्घायुष्य जगणं शक्य आहे; रोजच्या लाईफमध्ये हे 5 बदल करा

Long Life Tips: दीर्घायुष्य जगणं शक्य आहे; रोजच्या लाईफमध्ये हे 5 बदल करा

Proven Ways to Quickly Extend Lifespan : प्रत्येकालाच दीर्घायुष्य हवे असते, पण नकळत आपण अशी जीवनशैली जगू लागतो जी आपले आयुष्य 5 ते 10 वर्षांनी कमी करते. MDVIP च्या एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सगळ्याच लोकांना जास्त काळ जगायचे असते, परंतु आयुष्य निरोगी राहून कसे वाढेल, हे अनेकांना माहीत नसते.

16

अभ्यासात असे आढळून आले की, संशोधनात भाग घेतलेल्या 87 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना दीर्घकाळ जगण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर अर्ध्याहून अधिक लोकांना 100 किंवा त्याहून अधिक वयापर्यंत (53%) जगायचे आहे. मात्र, 4 पैकी 3 लोक, म्हणजे 74% असे लोक होते ज्यांना जास्त काळ जगण्यासाठी काय करावे हे माहीत नव्हते. eatdisnotthat च्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत हेल्दी सवयींचा अवलंब केला आणि सकारात्मक राहिल्यास दीर्घायुष्य जगू शकता. चला जाणून घेऊया दीर्घायुष्य जगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

26

दीर्घकाळ आयुष्य जगण्यासाठी टिप्स- व्हिटॅमिन डी - क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन डीची कमतरता ही एक कॉमन जागतिक समस्या आहे. जगभरात सुमारे 1 अब्ज लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. वास्तविक हाडे, स्नायू आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. तसे, आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी बनवत असते. पण जेव्हा त्याची कमतरता असते, तेव्हा तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मन, ट्यूना आणि दुग्धजन्य पदार्थ (जे मजबूत आहेत) समाविष्ट करून त्याची कमतरता भरून काढू शकता. व्हिटॅमिन डी कमी पडत असेल तर तुमचे आयुष्य कमी होऊ शकते.

36

सकारात्मक विचार - हार्वर्ड T.H. संशोधकांच्या नेतृत्वात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, आनंदी राहणे, तणावमुक्त राहणे आणि आशावादी राहणे यामुळे आयुष्याचा कालावधी वाढण्यास खूप मदत होते. जर तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि आशावादी दृष्टिकोनाने जीवन जगलात तर तुम्ही दीर्घायुषी होऊन आजारांपासून दूर राहण्यास खूप मदत होते. त्याचे मानसिक आरोग्यासाठी आणखी बरेच फायदे आहेत.

46

स्क्रीन टाईम कमी करा - तुम्ही सोशल मीडियावर जितका जास्त वेळ घालवाल तितकी झोप कमी होईल. कमी झोपेमुळे, शरीर रात्रीच्या वेळी स्वतःला रिकव्हर करू शकत नाही आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने वाढू लागते. यामुळे नैराश्य, तणाव, अस्वस्थता सुरू होते आणि आपोआप आयुष्य कमी होऊ लागते. म्हणूनच शक्य तितक्या लवकर स्क्रीन टाइम कमी करणे आणि झोपेची पद्धत सुधारणे महत्त्वाचे आहे.

56

मशरूम खाणे - आहारात मशरूम खाणे शक्य असल्यास त्याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल आणि तुम्ही जास्त काळ जगू शकाल. इंटरनल मेडिसीन, एमडी डॉ. मो. कारा म्हणाले की मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, सेलेनियम, एर्गोथिओनिन आणि ग्लूटाथिओन असते, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्सचे नुकसान वेगाने बरे करतात. यामध्ये इतरही अनेक फायदे आहेत, जे आपल्या शरीराच्या आवश्यक भागांना बरे करण्यास आणि निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात.

66

7 ते 9 तासांची झोप - आंतरिक चिकित्सा आणि एंडोक्रिनोलॉजी बोर्ड प्रमाणित (एमडीवीआईपी) मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. एंड्रिया क्लेम्स सांगतात की, नीट झोप न झाल्याने टाइप 2 मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि नैराश्य यासारखे अनेक रोग वाढतात. साहजिकच या रोगामुळे आपले आयुष्य कमी होते. झोपेची कमतरता ही मानसिक आजार वाढवण्याचेही काम करते. त्यामुळे कोणीही 7 ते 9 तासांची झोप घेणे दीर्घायुष्यासाठी गरजेचे आहे. या बातमीसाठी वापरलेले स्त्रोत लिंक - 1) https://www.mdvip.com/most-americans-want-live-longer-few-know-how-new-longevity-study-shows 2) https://www.eatthis.com/proven-ways-to-quickly-extend-your-lifespan/ 3) https://my.clevelandclinic.org/health/diseases/15050-vitamin-d-vitamin-d-deficiency#:~:text=Vitamin%20D%20deficiency%20is%20a%20common%20global%20issue.,States%20have%20vitamin%20D%20deficiency.

  • FIRST PUBLISHED :