NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 'या' पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी

'या' पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी

कोशिंबीर हा व्हिटॅमीन (Vitamins) आणि खनिजं (Minerals) घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या आहारात दररोज कोशिंबीरचा समावेश करा.

18

कोशिंबीरी बनवणं खूप सोपं असतं. यात भरपूर पौष्टिक घटक असतात. विविध प्रकारची फळं आणि भाज्या एकत्र करून सॅलड तयार केलं जाऊ शकतं. काही लोक आवड म्हणून कोशिंबीर खातात तर, काही लोक डायटिंगसाठी वापरतात. कोशिंबीर हा व्हिटॅमीन आणि खनिजं घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

28

चांगल्या आरोग्यासाठी सॅलड खायला हवं. सॅलडमध्ये विविध प्रकारच्या भाज्या फळं आणि मोड आलेली कडधान्य किंवा शेंगदाणे वापरता येतात.

38

त्यामुळे आपल्या आहारात दररोज कोशिंबीरचा समावेश करा. यामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही तर, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रासही संपतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नियमितपणे कोशिंबीर खावी.

48

कोशिंबीरमध्ये गाजरांचा समावेश करावाच. कारण गाजरात बीटा केरोटीन नावाचं व्हिटॅमीन असतं. जे दृष्टीस चांगली करतं. याव्यतिरिक्त,त्यात ऍन्टिऑक्सिडंट देखील आढळतात.

58

त्यामुळे मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांपासून आपलं संरक्षण होत. गाजर खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

68

कोशिंबीरमध्ये टोमॅटो जरुर टाका. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते. याशिवाय वजन कमी करण्यास देखील मदत होते. टोमॅटोत फायबर असतं. जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. टोमॅटो खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

78

काकडी खाणं खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, ए,के,ल्युटन हे पौष्टिक पदार्थ असतात आणि भरपूर पाणी असतं.

88

ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. काकडी पोटाशी संबंधित अनेक समस्या देखील दूर करते.

  • FIRST PUBLISHED :