गरोदरपणात आहार सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही Overeating करणार नाही, याची काळजी घ्या. वजन जास्त वाढलं तर प्रसूतीमध्ये समस्या येईल.
गर्भावस्थेत शरीराचं तापमान वाढल्याने घाम खूप येतो, त्यामुळे तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि प्रसूतीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.
तुम्हाला वाटतं की गरोदरपणात जास्त हालचाल करू नये, तर ते चुकीचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्सरसाईज करा.
गरोदरपणात जास्त स्ट्रेस घेऊ नका, यामुळे गर्भातील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय वेळेआधीच प्रसूती होण्याचा धोका वाढतो.
तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत माहिती करून घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. याची प्रसूतीसाठी खूप मदत होईल.