लसूण कांद्यातल्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात आणि त्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या एका वाटीत टाकाव्यात.
दोन मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर लसूण पाकळ्या बाहेर काढाव्यात आणि नखांनी सोलाव्यात.
पाण्यात भिजल्यानंतर लसूण पाकळ्या सोलणं एकदम सोपं झाल्याचं लक्षात येईल. अशा पद्धतीने लसूण पाकळ्या सोलताना नखं दुखत नाहीत, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
लसूण पाकळ्यांची टोकं सुरीच्या साह्याने कापून नंतर त्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या वाटीत दोन मिनिटं ठेवल्यास पाकळ्यांची सालं काढणं आणखी सोपं जातं.
लसूण पाकळ्या 30 सेकंद मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवल्या, तरीही सालं सोलणं सोपं जातं.
लसूण पाकळ्या काही वेळ तव्यावर गरम केल्या, तरी त्यानंतर पाकळ्यांची सालं काढणं सोपं जातं.
लसूण पाकळ्या मलमलच्या एका कापडात गुंडाळाव्यात. त्यावर हातोडा किंवा एखाद्या जड वस्तूने ठोकावं. त्यानंतर लसूण पाकळ्या सोलणं सोपं जातं.
पदार्थांना फोडणी घालण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. इटालियन, मेक्सिकन अन्नपदार्थांतही लसूण वापरली जाते.
त्यामुळे लसूण आहारात नेहमी असेल, तर संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची शरीराची शक्ती टिकून राहू शकते.