प्रोफाइल फोटो - ऑनलाइन डेटिंगमध्ये प्रोफाइल फोटोच सर्वात आधी हृदयाचे दरवाजे उघडतो. जर त्यातून तुम्ही एकाकी दिसत असाल, तर समोरच्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही खूप बोअर आहात, पहिल्यांदाच तुमचं इम्प्रेशन खराब होईल. शिवाय सिंगल मित्रमैत्रिणीसोबत फोटो लावू नका, यामुळेही नकारात्मक प्रभाव पडतो. एखादा ग्रुप फोटो ज्यामध्ये तुम्ही आनंदी असाल असा फोटो लावा.
आवडीनिवडू लिहू नका - ऑनलाइन डेटिंग करताना एका गोष्टीचं भान असू द्या की तुम्ही मुलाखत देत नाही आहात. त्यामुळे तुमच्या प्रोफाइल तुमच्या आवडीनिवडींबाबत जास्त माहिती देऊ नका. स्वत:च्या प्रोफाइलवर स्वत:चं कौतुक करू नका. शिवाय तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे, हेदेखील नमूद करू नका. यामुळे तुमचं प्रोफाइल बोरिंग वाटेल, शिवाय काही लोकं याला तुमचा अॅटीट्यु़ड समजू शकता.
पहिला मेसेज विचारपूर्वक लिहा - पहिला मेसेज पाठवताना खबरदारी घ्या. पहिलाच मेसेज तुमचे संबंध जोडतो किंवा तोडतो. त्यामुळे हा मेसेज ना मोठा असला पाहिजे ना छोटा आणि अगदी गंभीरही नसावा. हलका-फुलका आणि मजेशीर असावा.
प्रोफाइलमध्ये दिखावा नसावा - ऑनलाइन डेटिंग करताना बनावट प्रोफाइल किंवा चुकीची माहिती बिलकुल देऊ नका. तुमच्यासाठी परफेक्ट असेल अशा जोडीदाराशी तुमचं बोलणं सुरू असेल, तर त्याच्याशी खोटं बोलू नका. तुम्ही जितके प्रामाणिक असाल, तितकाच प्रामाणिक जोडीदार तुम्हाला मिळेल.
प्रत्येक गोष्ट साधी असावी - प्रोफाइल, फोटो, मेसेज जितके साधे असतील, तितकीच तुम्हाला प्रतिक्रियाही तशीच मिळेल. रिलेशनशिपमध्ये हेच महत्त्वाचं असतं. साधेपणा सर्वांना आवडतो, त्यामुळे डेटिंगवेळीही साधंच असावं.