बरीच ठिकाणी रोमान्स किंवा कपल स्पॉट म्हणून ओळखले जातात. इथं बरेच कपल असतात. अशा ठिकाणी कपल खुलेआम रोमान्स करताना दिसतात.
अगदी गार्डनसारख्या सार्वजनिक ठिकाणीही कपलचा रोमान्स सुरू असतो. अशा ठिकाणी कपलच्या रोमान्सवर बंदी असते. किस किंवा अश्लील चाळे करण्यास मनाई असते.
पण आता फक्त किस आणि अश्लील चाळेच नव्हे तर आता कपलला एकमेकांना चिपकून बसण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
एका गार्डनमध्ये अश्लीलतेच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. झाडाझुडुपांमागे अनेकदा जोडपी आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर उद्यान व्यवस्थापनाने कपलवरील निर्बंध अधिक कठोर केले आहेत. कपलसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार आता जोडप्यांना उद्यानात अगदी जवळ बसणे, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
उद्यान व्यवस्थापनाने नमूद केलेला मुद्दा केवळ मर्यादेचाच नाही तर सुरक्षेचाही होता. कारण दाट झाडीमध्ये जोडप्यांना साप आणि कीटक चावण्याचा धोका होता.
आता हे नियम कोणत्या गार्डनमध्ये लागू करण्यात आले आहेत, तर हे हार्जन आहे, कर्नाटकच्या बंगळुरूतील कब्बन पार्क. त्यामुळे लव्ह बर्ड्सनी याठिकाणी जरा जपूनच राहा.