NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / किमान 31 जानेवारीपर्यंत पुन्हा कठोर नियम; नव्या कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारची धडपड

किमान 31 जानेवारीपर्यंत पुन्हा कठोर नियम; नव्या कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारची धडपड

नव्या कोरोनाव्हायरसचा (new corona strain) धोका लक्षात घेता संक्रमण रोखण्यासाठी ज्या गाइडलाइन्स तयार केल्या आहेत, त्यांची मर्यादा आता सरकारनं वाढवली आहे.

17

भारतात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1,02,07,871  झाली आहे. त्यापैकी 2,77,301 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकूण प्रकरणांपैकी फक्त 2.72 टक्के लोक उपचार घेत आहेत. सलग सातव्या दिवशी उपचाराधीन लोकांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी आहे.

27

एकूण रुग्णांपैकी 97,82,669 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.83 झाला आहे. तर 1,47,901 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर 1.45 टक्के आहे.

37

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. अॅक्टिव्ह आणि नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी घटली आहे. पण जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांची प्रकरणं वाढली आहेत. शिवाय ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाचा कोरोनाव्हायरस दिसून आला आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

47

याआधी कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी, संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काही पावलं उचलली होती. काही मार्गदर्शक सूचना आणि नियम बनवले होते. आता असेच नियम आणि सूचना नव्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी तयार केल्या आहेत. 

57

केंद्रीय गृह मंत्रालयानं कोव्हिड-19 बाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं जे काही नियम बनवले आहेत त्यांची मर्यादा 31 जानेवारी  2021  पर्यंत वाढवली आहे.

67

कंटेनमेंट झोनमधून कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही किंवा तिथं येणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच या भागातील व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नियमांचं सक्तीनं पालन करावं.

77

देशातील विविध भागात काही नागरिक ब्रिटनहून परतले आहेत. त्यांची कोरोना टेस्ट केली त्यापैकी काही रुग्ण कोरोना प़ॉझिटिव्ह आढळले आहेत. पण त्यांना नवा कोरोना झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • FIRST PUBLISHED :