देशातील कोरोनाची वाढती संख्या पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण सणासुदीच्या काळात हे नियम लोकांनी धाब्यावर बसवले आहेत. आज गुढीपाडव्यानिमित्त लोकांनी बाजारात तोबा गर्दी केली. (फोटो - न्यूज 18)
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये हिंदू नववर्ष उगाडी किंवा युगाडी म्हणून ओळखलं जातं आणि त्याच निमित्ताने मोठ्या संख्येने लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडले.
हे चित्र आहे कर्नाटकातील बंगळुरूच्या बाजारातील. जिथं लोकांनी पुजेचं सामान खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली.
यावेळी सोशल डिस्टन्सिंग तर कुणीच राखलं नाही. शिवाय बहुतेकांच्या चेहऱ्यावर तर मास्कही नव्हते.
अशीच परिस्थिती महाराष्ट्राचीसुद्धा आहे. महाराष्ट्रातील दादर मार्केटमधील हे दृश्य आहे.
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं असतानाही दादरच्या फूल मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळाली.
कर्नाटक आणि महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातही हीच परिस्थिती.
नवीन प्रकरणं वाढत असताना कोलकात्यातही अशी गर्दी पाहायला मिळाली.