NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तरुणांनाही मागे टाकणारे 72 वर्षांचे बॉडीबिल्डर आजोबा; त्यांच्या फिटनेसचं रहस्य नेमकं आहे तरी काय?

तरुणांनाही मागे टाकणारे 72 वर्षांचे बॉडीबिल्डर आजोबा; त्यांच्या फिटनेसचं रहस्य नेमकं आहे तरी काय?

.या बॉडीबिल्डर (bodybuilder) आजोबांना 7 मुलं आणि 5 नातवंडं आहेत.

  • -MIN READ

    Last Updated: March 31, 2021, 08:58 IST
17

हे आहेत 72 वर्षांचे मलेशियन बॉडीबिल्डर ए. अरोकियासामी (A. Arokiasamy). या वयातही आपल्या व्यायामशाळेत दररोज वेटलिफ्टिंग (Weightlifting) करण्याचा त्यांचा नेम चुकलेला नाही. अत्यंत व्यस्त अशा रूटिनमध्ये हेल्दी (Healthy) राहणं हा कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं ते म्हणतात. (फोटो सौजन्य - AFP)

27

अरोकियासामी हे भारतीय वंशाचे असून, तिथल्या अल्पसंख्याकांत त्यांचा समावेश होतो. शाळा अर्ध्यातून सुटल्यानंतर अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) क्षेत्रात प्रवेश केला.  (फोटो सौजन्य - AFP)

37

मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe) या स्पर्धेत त्यांनी मलेशियाचं अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. 1981मध्ये फिलिपाइन्समध्ये झालेल्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचा माजी विजेता आणि हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) हा अरोकियासामींचा आदर्श.  (फोटो सौजन्य - AFP)

47

अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डर होऊ इच्छिणाऱ्यांना वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तसंच त्यांनी तेलुक इन्टन गावात स्वतःची व्यायामशाळा उघडली. दिवसाला केवळ एक डॉलर एवढं शुल्क ते घेतात. त्यांच्या प्रयोगशाळेत कायमच पुरुषांची गर्दी असते. (फोटो सौजन्य - AFP)

57

'वेटलिफ्टिंग, व्यायाम आदी गोष्टी म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत आणि तुम्हाला हेल्दी राखतात,' असं अरोकियासामी यांनी एएफपीला सांगितलं. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांना सात मुलं आणि पाच नातवंडं आहेत.  (फोटो सौजन्य - AFP)

67

बॉडीबिल्डिंग वयस्कर व्यक्तींशी फारसं संबंधित नाही; पण ज्यांना ते करण्याची सवय आहे आणि ज्या व्यक्ती ते सुरू ठेवतात, त्यांच्या आरोग्याला त्याचे चांगले फायदे होतात, असं संशोधन सांगतं.  (फोटो सौजन्य - AFP)

77

2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं होतं, की 65 वर्षांवरील ज्या व्यक्ती आठवड्यातून किमान दोनदा तरी चांगला व्यायाम करतात, त्यांच्या आयुष्याचा कालावधी बऱ्यापैकी वाढला.  (फोटो सौजन्य - AFP)

  • FIRST PUBLISHED :