NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Monsoon Wedding : पावसाळ्यात लग्न करताय? अशी करा तयारी होईल Happy wedding

Monsoon Wedding : पावसाळ्यात लग्न करताय? अशी करा तयारी होईल Happy wedding

पावसाळ्यात लग्न करण्याची कल्पना सुंदर असली तरी त्याचं नियोजन तितकचं कठीण आहे. सुंदर निळ्या आकाशाखाली रोमँटि वेडिंग करताना आयोजनासाठीही मेहनत घ्यावी लागते.

16

कोरोनामुळे काहींचे ठरलेले लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले गेले आहेत. काही जणांनी कोरोनाचा कहर कमी झाल्यावर पावसाळ्यातही लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. पावसाळ्यात आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि लग्नासारखा कार्यक्रम अविस्मरणीय करण्यासाठी काही टिप्स वापरून फायदा होऊ शकतो.

26

पावसाळ्यात लग्न करण्यासाठी योग्य जागा निवडणं आवश्यक आहे. ओपन स्पेसमध्ये लग्न करणार असाल किंवा अगदी घरातही लग्न करायचा विचार असेल तरी, आलेले पाहुणे पावसात भिजणार नाहीत याचा विचार करून लग्नाचं ठिकाण आणि राहण्याची जागा ठरवली पाहिजे.

36

लग्नाच्या डेकोरेशनबरोबर लग्नातलं जेवण दुसरी महत्त्वाची गोष्ट असते. पाहुण्यांना जेवण आवडायला हवं याची काळजी आपण घेतोच पण पावसाच्या दिवसात पाण्यामुळे जेवण खराब होऊ शकतं. तर स्वच्छ ठिकाणी जेवण तयार व्हावं यासाठी जागा निवडणंही महत्त्वाचं आहे.

46

लग्नासाठी मंडप सजवताना रंगबेरंगी किंवा साधी सजावटं करतानाही त्यासाठी वापरलेलं सामान वजनाने हलकं असेल याची काळजी घ्या. कारण पावसाळ्यात सुटणाऱ्या वेगवान हवेमुळे जड वस्तू पडल्या तर काही अपघात होण्याचीही भीती असते.

56

पावसाळ्यातल्या लग्नासाठी स्टायलिश पण कम्फर्टेबल चप्पल, कपडे निवडा. पाऊस आल्यावर धावाधाव करावी लागली तर तेव्हा याचा उपयोग होऊ शकतो. दागिने घालताना त्यामुळे अॅलर्जी होणार नाही याची काळजी घ्यावी.

66

पावसाळ्यातल्या लग्नासाठी वॉटरप्रुफ मेकअपच करावा. लूक चांगला दिसण्यासाठी हलका मेकअप करावा.

  • FIRST PUBLISHED :