NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Cleaning Tips : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपाय

Cleaning Tips : पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? मग करा हे सोपे उपाय

पावसाळा ऋतू आला कि जमिनीखाली असलेले अनेक कीटक वर येतात. यात गांढूळ, घोण असे सरपटणारे प्राणी आणि अनेक प्रकारच्या कीटकांचा समावेश असतो. पावसाळा सुरु झाला की हे कीटक बाथरूममध्ये येतात आणि लक्ष न दिल्यास घरातील इतर खोलींमध्ये देखील त्यांचा शिरकाव होतो. यामुळे पावसाळ्यात घरात अस्वच्छता पसरते आणि कीटकांची किळस देखील वाटते. तेव्हा या कीटक आणि प्राण्यांपासून कशी सुटका मिळवायची यासाठी काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

15

व्हिनेगर : बाथरूममधील गांडूळ घालवण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हाईट व्हिनेगर बाथरूममध्ये टाकल्यामुळे केवळ गांडूळंच नाही तर इतर किडे देखील बाथरूममध्ये येणार नाहीत. यासाठी दोन लिटर पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळा. यापाण्याने बाथरूम नीट स्वच्छ करा आणि शेवटी हे मिश्रण बाथरूममध्ये टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या.

25

मीठ : जर तुम्हाला पावसाळ्यात घरात येणाऱ्या गांडूळांना घालवायचं असेल तर त्यांच्यावर मिठाचा वापर करा. गांडूळ दिसल्यावर त्यावर मीठ टाका, जेणेकरून ते निघून जातील आणि त्यानंतर बाथरूमची स्वच्छता करा.

35

बाथरूम क्लिनर : पावसाळ्यात बाथरूममध्ये गांडूळ येऊ नयेत म्हणून तुम्ही बाथरूम टाईल्सवर बाथरूम क्लिनरची फवारणी करू शकता. जेणेकरून बाथरूममध्ये गांडूळ येणार नाहीत.

45

बेकिंग सोडा : बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. ड्रेनेज पाईपमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाकून अर्धा तास राहू द्या आणि मग त्या पाईपमध्ये पाणी टाकून स्वच्छ करा. यामुळे बाथरूममध्ये गोम किंवा गांडूळ येणार नाहीत.

55

स्वच्छता राखा : पावसाळ्यात घराची आणि विशेषतः बाथरूमची अधिक स्वच्छता राखा. जेणेकरून पावसाळ्यातील कीटकांचा शिरकाव घरात होणार नाही आणि घर निरोगी राहील.

  • FIRST PUBLISHED :