पावसाळ्यात ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर ती छत्री आधी नीट झाडून घ्या. त्यातले पाणी नितळले की छत्री उन्हात सुकायला ठेवा, असे केल्याने छत्री लवकर सुकेल.
जर छत्री सुकवण्यासाठी बाहेर ऊन नसेल तर ज्या ठिकाणी वाहता वारा आहे, अश्या ठिकाणी तुम्ही छत्री सुकवू शकता.
ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर तुम्ही ती खोलून सुकवा. जेणेकरून ती काही वेळातच कोरडी होईल.
ओली छत्री सुकवण्यासाठी तुम्ही तिला फॅन खाली देखील ठेऊ शकता. जेणेकरून फॅनच्या तीव्र हवेने छत्र्या सुकतील.
जर छत्री खोलून सुकवण्याची जागा नसेल तर तुम्ही ती एका ठिकाणी आडवी अडकवून ठेऊ शकता. जेणेकरून छत्रीमधील पाणी निघून जाईल.
तुमच्या ऑफिसमध्ये हँड ड्रायर असेल तर त्याचा वापर तुम्ही छत्री सुकवण्यासाठी करू शकता.