NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरताय? जाणून घ्या प्रकार आणि योग्य कोणते

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरताय? जाणून घ्या प्रकार आणि योग्य कोणते

प्रौढ स्त्रीला वयाच्या पन्नाशीपर्यंत दर महिन्याला मासिक पाळी म्हणजेच पीरियड्स येतात. या काळात योनीतून होणाऱ्या रक्तस्रावामुळे कपडे खराब होऊ नयेत यासाठी सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन्स आणि मेन्स्ट्रुअल कप वापरले जातात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: July 29, 2023, 16:23 IST
17

मेन्स्ट्रुअल कप हे एक प्रकारचं पुन्हा वापरता येण्याजोगं साधन आहे. हा सिलिकॉन कप लवचिक आणि फनेलच्या आकाराचा असतो. एक कप 10 वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येतो. सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सच्या तुलनेत कप जास्त सुरक्षित मानले जातात.

27

पर्यावरणास अनुकूल: मेन्स्ट्रुअल कप हे पर्यावरणास अनुकूल आहेत. सॅनिटरी पॅडचं विघटन होण्यासाठी 500 वर्षांहून अधिक काळ लागतो. तर, कप पुन्हा वापरता येण्याजोगे असतात. एक कप अनेक वर्षं वापरता येऊ शकतो.

37

आरामदायी: मेन्स्ट्रुअल कप आठ तासांसाठी लीकेजपासून संरक्षण प्रदान करतो. तर, पॅड आणि टॅम्पोन्स दर तीन ते चार तासांनी बदलावे लागतात.

47

इतर सॅनिटरी वस्तूंपेक्षा जास्त सुरक्षित: बाजारातील बहुतेक पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक रसायनं आणि कृत्रिम पदार्थ असतात जे स्त्रीच्या जननेंद्रियाच्या संवेदनशील त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात. शिवाय यामुळे योनीच्या पीएचमध्ये व्यत्यय येऊ शकतो. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात. त्यामुळे योनीच्या नियमित पीएचला किंवा जननेंद्रियाच्या नाजूक त्वचेला त्रास होत नाही.

57

पॉकेट-फ्रेंडली: मेन्स्ट्रुअल कप हे पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत आणि जवळजवळ एक दशक टिकतात. यामुळे, सिंगल युज उत्पादनांच्या असंख्य पॅकपेक्षा कप लक्षणीयरित्या कमी खर्चिक ठरतात.

67

जास्त रक्तस्राव जमा करण्याची क्षमता: मेन्स्ट्रुअल कपमध्ये 15-25 मिली रक्त (कपच्या आकारानुसार) जमा करता येतं. साधारण टॅम्पोन किंवा पॅडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. परिणामी, तुम्ही 8 तासांपर्यंत एक कप वापरू शकता. शिवाय यामुळे पुरळ उठण्यासारखी समस्याही उद्भवत नाही.

77

सध्या बाजारात विविध प्रकारचे आणि आकाराचे मेन्स्ट्रुअल कप उपलब्ध आहेत. तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेऊन तुमच्यासाठी कोणता कप योग्य आहे, याबाबत चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर योग्य तो कप खरेदी केला पाहिजे.

  • FIRST PUBLISHED :