NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाच्या परिस्थितीत तुमचा फर्स्ट एड बॉक्स तयार आहे ना?

कोरोनाच्या परिस्थितीत तुमचा फर्स्ट एड बॉक्स तयार आहे ना?

काही औषधं आणि मेडिकल किट तुमच्या जवळ असल्यास चांगलं आहे.

17

सर्दी-खोकला-ताप ही कोरोनाव्हायरसची लक्षणं आहेत. याचा अर्थ तुम्हाला कोरोनाव्हायरस असेलच असं नाही. मात्र आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणामध्ये अशी लक्षणं दिसली तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला नको. त्यामुळे काही औषधं आणि मेडिकल किट तुमच्या जवळ असल्यास चांगलं आहे.

27

थर्मामीटर - ताप येणं हे कोरोनाव्हायरसचं लक्षणं आहे, त्यामुळे तुमच्याकडे एक थर्मामीटर असू द्या. जेणेकरून कोरोनासारखी लक्षणं जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्यामध्ये दिसली तर तुम्ही त्यांचं तापमान तपासू शकता. थर्मामीटर वापरून झाल्यानंतर ते डिसइन्फेक्ट करायला विसरू नका. थर्मामीटर नसेल, तरी शरीराच्या तापमान हातानं तपासत राहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

37

पल्स ऑक्सिमीटर - कोरोना रुग्णांमध्ये न्यूमोनियासारखी लक्षणंही दिसतात. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते. मात्र न्यूमोनिया आहे, याचा अर्थ कोरोना आहेच असं नाही. तरी पल्स ऑक्सिमीटर असायला हवं जेणेकरून तुम्ही घरच्या घरी ऑक्सिजनची पातळी तपासू शकता. श्वास घेण्यात त्रास हे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं एक लक्षण आहे. जर तुमच्याकडे पल्स ऑक्सिमीटर नसेल तरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

47

ताप आणि वेदनाशामक औषधं - लॉकडाऊनमध्ये शरीरात वेदना होणं सामान्य आहे. मात्र ही लक्षणं कोरोनासारखीच आहेत. मात्र घाबरून जाऊ नका. लॉकडाऊनमुळे घरातच असल्यानंही तुम्हाला अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेदनाशामक आणि ताप कमी करणारी औषधं डॉक्टरांच्या सल्लानुसार घ्या. मात्र या औषधांचं अधिक सेवनही हानिकारक ठरू शकतं. एकदा ही औषधं घेतल्यानंतर बरं वाटलं नाही तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

57

घशात खवखव कमी करणारी औषधं - स्ट्रेप्सिल्स, विक्स अशी घशात खवखवीपासून आराम देणारी औषधं आहेत. घशाच्या काही समस्या असल्यास ही औषधं एकदा घेऊन बघा. आराम नाही मिळाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

67

डायरिया - डायरियाची समस्या असल्यास ओआरएस किंवा इलेक्ट्रॉल पावडर पाण्यात मिसळून पिऊ शकता, जेणेकरून तुम्हाला थकवाही येणार नाही.

77

ही औषधं आणि उपकरणं तुमच्याकडे असली तरी त्यावर अवलंबून राहू नका. या फक्त तात्काळ आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना आहेत. ही औषधं घेण्यापूर्वी आणि पल्स ऑक्सिमीटरसारखं उपकरण हाताळण्यापूर्वी डॉक्टराचंं मार्गदर्शन घ्या. शिवाय औषधांचं सेवनही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. लक्षणं कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • FIRST PUBLISHED :