आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर जादू करणारी आणि नृत्य आणि सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमृता आपले ट्रेडिशनल आणि हॉट लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच तिनं आपले असेच काही हॉट, सेक्सी फोटो शेअर केले आहेत. ज्यावर प्रतिक्रिया देण्यापासून श्रेया बुगडेही स्वतःला रोखू शकली नाही. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमृतानं आपल्या इन्स्टाग्रामवर व्हाइट शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूपच सेक्सी आहे. यावर तिच्या चाहत्यांच्या हॉट अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर श्रेया बुगडेनं गरम मामला अशी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमृतानं फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत एक स्थान निर्माण केलं आहे. खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं चांगलंच प्रदर्शन केलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्याही सतत संपर्कात असते. आपले बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)