NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Heart Attack: तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही

Heart Attack: तारुण्यात हार्ट अटॅक टाळायचा असेल तर काही गोष्टींना पर्याय नाही

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील.

19

तरुणांमध्ये वाढलेल्या हृदयविकारांसाठी कोरोना लस कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, त्यासंबंधित अद्याप खात्रीशीर माहिती समोर आली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

29

अलीकडच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्यामागची कारणे व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, असंही तज्ज्ञांनी सांगितले.

39

यातील सर्वात मोठं कारण म्हणजे वाईट जीवनशैली आणि सवयी. याशिवाय तणावामुळेही हृदयविकाराचा झटका येतो. हे धोके तुम्हीही टाळू शकता.

49

दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. दररोज किमान 30 ते 60 मिनिटे व्यायाम करा. कारण यामुळे तुमचे शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

59

फक्त सकस आहार घ्या. अधिकाधिक भाज्या आणि फळे खा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर मासे आणि चिकन सारखे लीन मीट खा. रेड मांस, जास्त मीठ आणि साखरेचे सेवन टाळा. प्रक्रिया केलेले अन्न आणि अल्कोहोलपासून दूर रहा. तुमच्या उंचीनुसार वजन ठेवा.

69

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण धूम्रपान करणे बंद केले पाहिजे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला धूम्रपान करणे किंवा तंबाखूचे सेवन करणे बंद करावे लागेल. तुम्ही धूम्रपान करत नसल्यास, तुम्ही निष्क्रिय धुम्रपान टाळले पाहिजे, म्हणजे धूम्रपान करणाऱ्या लोकांभोवती उभे राहू नका.

79

आज झोप न लागणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. रात्री किमान 7-8 तासांची चांगली झोप घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ज्या लोकांना रात्री चांगली झोप लागते त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, नैराश्य आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो.

89

तणावाचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे, कारण ते तुम्हाला ओव्हरइटिंग, दारू पिणे आणि धूम्रपान टाळण्यास मदत करू शकते. ध्यान, शारीरिक हालचाल, विश्रांती तंत्र यासारख्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा.

99

कारण हृदयविकाराची सुरुवात रक्तदाब वाढल्यापासूनच होते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. एकदा तुम्ही 18 वर्षांचे झाल्यावर, तुम्ही दर एक किंवा दोन वर्षांनी तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण सुरू केले पाहिजे.

  • FIRST PUBLISHED :